Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री डेअरीमध्ये दरवाजा बंद करुन झोपले, अचानक आग लागली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

बिबवेवाडी परिसरात डेअरीत लागलेल्या आगीत डेअरी मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बिबवेवाडी भागातील सुखसागरनगर भागात मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 18, 2024 | 04:16 PM
रात्री डेअरीमध्ये दरवाजा बंद करुन झोपले, अचानक आग लागली अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

रात्री डेअरीमध्ये दरवाजा बंद करुन झोपले, अचानक आग लागली अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:

पुणे : बिबवेवाडी परिसरात डेअरीत लागलेल्या आगीत डेअरी मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बिबवेवाडी भागातील सुखसागरनगर भागात मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रामदास साळुंके (वय ६५, रा. येरवडा) असे मृत्यू झालेल्या डेअरी मालकाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

बिबवेवाडीतील सुखसागरनगर भागात साळुंके यांची किसान डेअरी आहे. नेहमीप्रमाणे दूधाच्या गाड्या आल्यानंतर ते डेअरीत झोपायचे. गुरुवारी रात्री ते डेअरीत झोपले होते. मध्यरात्री बाराच्या सुमारास डेअरीतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे नागरिकांनी पाहिले. लागलीच नागरिकांनी डेअरीचा दरवाजा तोडला. डेअरीत मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. त्यामुळे या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. तोपर्यंत आगीने पेट घेतला होता.

कात्रज अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. परंतु, आगीत साळुंखे होरपळले गेले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे.

गुरुवारी पहाटे घोरपडे पेठेतील पंचहौद टॉवरजवळ एका जुन्या वाड्याला लागण्याची घटना घडली होती. आगीत पाच खोल्या आणि दुकान जळाले होते. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नव्हते.

Web Title: The owner of the dairy has died in a fire in a dairy in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 04:10 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

CM Fadnavis Birthday: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी रोजगार अन् कौशल्य विकासाचा संकल्प दृढ – मंत्री मंगल प्रभात लोढा
1

CM Fadnavis Birthday: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी रोजगार अन् कौशल्य विकासाचा संकल्प दृढ – मंत्री मंगल प्रभात लोढा

उच्च रक्तदाब, मधुमेह अन् लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
2

उच्च रक्तदाब, मधुमेह अन् लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

शत्रूंची दाणादाण उडणार! Indian Army अन् CISF चा पुण्यात संयुक्त सराव; अंतर्गत सुरक्षा…
3

शत्रूंची दाणादाण उडणार! Indian Army अन् CISF चा पुण्यात संयुक्त सराव; अंतर्गत सुरक्षा…

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?
4

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.