
अजित वाडेकर संघाचे सलग दोन विजय
स्वराज गोगावले (३२ धावा) आणि स्वरा गाडे (२३ धावा) यांनीही धावांचे योगदान दिले. लाईनअप संघाच्या भागेश साठे याने २६ धावांत पाच गडी बाद केले. याला उत्तर देताना लाईनअप क्रिकेट ॲकॅडमीचा डाव ९८ धावांवर संपुष्टात आला. अजित वाडेकर संघाच्या आर्या व्यास हिने तीन गडी बाद केले. श्लोक सुरवे आणि श्रीजा गोगावले यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
Cricket News: नाद खुळा! PCMC क्रिकेट लीगमध्ये ‘या’ टीम्सचा जलवा; २नाईन स्पोर्ट्स क्लब थेट…
दुसऱ्या सामन्यात स्वरा गाडे हिने केलेल्या ४० धावांच्या जोरावर अजित वाडेकर संघाने डीजेसीए क्रिकेट ॲकॅडमीचा ४७ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळणाऱ्या अजित वाडेकर क्रिकेट ॲकॅडमीने १७.३ षटकात १४५ धावा धावफलकावर लावल्या. स्वरा गाडे (४० धावा), अबिर चोर (३५ धावा) आणि आर्या व्यास (२४ धावा) यांनी संघाचा डाव बांधला. डीजेसीएच्या आयुश सातपुते याने ३४ धावांत निम्मा संघ बाद केला. याला उत्तर देताना डीजेसीए क्रिकेट ॲकॅडमीचा डाव ९८ धावांवर आटोपला. युवी निबुडे याने ३८ धावा करून प्रतिकार केला. सुरंजन चौधरी याने १४ धावांत तीन गडी तर, पंकज शिंदे याने दोन गडी बाद केले.
अजित वाडेकर क्रिकेट ॲकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १८१ धावा. कैवल्य शिंदे ५३, स्वराज गोगावले ३२, स्वरा गाडे २३, भागेश साठे ५-२६, प्रज्ञा यालोरे २-२८ वि.वि. लाईनअप क्रिकेट ॲकॅडमीः २० षटकात १० गडी बाद ९८ धावा. भागेश साठे २९, अवनीश कुलकर्णी १५, आर्या व्यास ३-२६, श्लोक सुरवे २-११, श्रीजा गोगावले २-१८. सामनावीरः कैवल्य शिंदे.
DSP Cup 2026: सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी; पुणे Cricket क्लबचा ‘या’ संघावर थरारक विजय
अजित वाडेकर क्रिकेट ॲकॅडमीः १७.३ षटकात १० गडी बाद १४५ धावा. स्वरा गाडे ४०, अबिर चोर ३५, आर्या व्यास २४, आयुश सातपुते ५-३४ वि.वि. डीजेसीए क्रिकेट ॲकॅडमीः १९.४ षटकात १० गडी बाद ९८ धावा. युवी निबुडे ३८, काव्या मोहोळ १२, सुरंजन चौधरी ३-१४, पंकज शिंदे २-११; सामनावीरः स्वरा गाडे.
Ans: पुना वेस्टर्न क्लब करंडक ही टी 20 स्पर्धा पुण्यातील भुगाव येथील पीडब्ल्युसी मैदानावर सुरू आहे.
Ans: पुना वेस्टर्न क्लब करंडक मध्ये अजित वाडेकर अकादमीने सलग दोन सामने जिंकले.