BJP on Thackeray Brothers Alliance: महाराष्ट्रात महायुती सरकारने हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न केल्यानंतर राज्यभरातील मराठा समाजातून संतापाची लाट उसळली होती. या निर्णयाला विरोध म्हणून शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्तपणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. परिणामी, काही दिवसांतच सरकारला संबंधित शासन निर्णय (जीआर) मागे घ्यावा लागला.
या पार्श्वभूमीवर ५ जुलै रोजी वरळी डोम येथे ‘विजय मेळावा’ आयोजित करण्यात आला. तब्बल दोन दशकांनंतर उद्धव आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. या ऐतिहासिक क्षणी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. “ही आमची निवडणुकीसाठी केलेली युती नाही, ही मराठी अस्मितेसाठीची एकजूट आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी जनतेशी संवाद साधला.
Monsoon Alert: खबरदार! 9 जुलैपर्यंत नुसते धुमशान; वादळी वारे अन् IMD चा अलर्ट काय? कोकणात तर…
दरम्यान, या राजकीय हालचालींवर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी खळबळजनक दावा केला आहे. “उद्धव ठाकरे यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे त्यांचे उरलेले आमदार आणि खासदार आजही माझ्या संपर्कात आहेत. हे लवकरच सर्वांसमोर स्पष्ट होईल,” असे वक्तव्य करत त्यांनी ठाकरे गटाला नव्या अडचणींचा इशारा दिला. महाजन यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे बंधूंच्या एकजुटीनंतर मराठी मतांचे संघटन आणि भाजपविरोधातील वातावरण या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रीत झाले आहे.
सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. हिंदी सक्तीच्या मुद्यावर ठाकरे यांची भूमिका बदलल्याचा आरोप करत, महाजन यांनी त्यांना “पलटीबहाद्दर” अशी उपमा दिली. महाजन म्हणाले, “राज्यात हिंदी विषय सक्तीने लागू करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळातच घेण्यात आला होता. तो निर्णय मंत्रिमंडळात मान्य करण्यात आला आणि त्यावर उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. आता त्याच निर्णयाला विरोध करणे म्हणजे निव्वळ राजकीय सोयीचा पवित्रा आहे.”
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जूनच्या हप्त्याविषयी आदिती तटकरे म्हणाल्या
ते पुढे म्हणाले, “त्यांचे हे वर्तन पूर्णतः बालिश आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकांनंतर जनतेचा विश्वास कोणावर आहे आणि कोणाचा प्रभाव किती आहे, हे स्पष्ट होईल.” महाजनांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना दूर सारून उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेससोबत युती केली. या सत्तेच्या मोहात त्यांनी स्वतःचं राजकीय भविष्य अंधारात लोटलं आहे,” अशी टीका त्यांनी केली.गिरीश महाजन यांच्या या टीकेमुळे ठाकरे विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.