राज्याला मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- ani)
Maharashtra Weather: पुणे: भारतीय हवामान विभागाने राज्याला पुढील 2 दिवस तुफान पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पुस जोरदार बॅटिंग करणार आहे. महाराष्ट्राला 9 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टी, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. आज कोकण किनारपट्टीवर असलेल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
9 जुलैपर्यंत संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांमुळे बंगालचा उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम राज्यावर देखील होताना दिसून येणार आहे. कोकण, मध्य महराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात तूफान पाऊस होऊ शकतो. वादळी वारे आणि जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Monsoon Alert: सावधान! रेड अलर्टमुळे पाऊस आज ‘या’ राज्यात…; मान्सूनच्या आगमनाने दिल्लीकर सुखावले
गेले काही दिवस कोकण किनारपट्टी, घाटमाथा, तर पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवस रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
उत्तराखंडमध्ये पावसाचा रेड अलर्ट
देवभूमी उत्तराखंडमध्ये तर पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रूद्रप्रयाग, उत्तरकशी, डेहराडून, हरिद्वार, नैनीताल या जिल्ह्यांत आज दिवसभरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिमला हवामान विभगाने या जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंड राजुयत मान्सून दाखलजल्यापासून विविध घटनांमध्ये आतापर्यंत 20 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहा:कार
संपूर्ण देश मान्सूनने व्यापला आहे. देशातील अनेक राज्यात तूफान पाऊस सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.