Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात जीबी सिंड्रोमचा धोका वाढला; रुग्णसंख्या वाढतानाच सांगलीत दोघांचा मृत्यू

पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नागपूरनंतर आता सांगलीमध्येही जीबी सिंड्रोममुळे मृताची नोंद झाल्याने राज्यातील एकूण मृताची संख्या 11 वर पोहचली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 16, 2025 | 07:59 AM
जीबी सिंड्रोमचा महाराष्ट्रात धोका वाढला

जीबी सिंड्रोमचा महाराष्ट्रात धोका वाढला

Follow Us
Follow Us:

सांगली : महाराष्ट्रात सध्या ‘गिलेन बॅरे सिंड्रोम’ अर्थात GBS चा धोका वाढत आहे. रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यात मृतांचा आकडा कमी होताना दिसत नाही. सांगलीमध्ये या आजारामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 14 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. जीबीएसची लागण झालेले हे दोन्ही रुग्ण मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते.

मिरजेत मृत्यू झालेल्यात हुक्केरी (जि. बेळगाव) येथील 14 वर्षीय मुलाचा आणि सांगोला (जि. सोलापूर) येथील 60 वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नागपूरनंतर आता सांगलीमध्येही जीबी सिंड्रोममुळे मृताची नोंद झाल्याने राज्यातील एकूण मृताची संख्या 11 वर पोहचली आहे. सध्या राज्यात विविध रुग्णालयात 20 रुग्ण व्हेंटिलेटर आहेत. सांगलीच्या मिरजमधील शासकीय रुग्णालयात गेल्या 15 दिवसांत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील 15 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी 6 रुग्ण बरे झाले. त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे.

दरम्यान, सध्या सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक रुग्ण पुण्याला, तर एक कराडला उपचारासाठी गेला आहे. 15 रुग्णांमध्ये सांगली शहरातील 3 रुग्णांचा समावेश आहे. शहरात चिंतामणीनगर, विश्रामबाग आणि संजयनगरमध्ये ‘जीबीएस’चे रुग्ण आढळले होते.

पंढरपुरात दोन रुग्ण

माघी यात्रेनंतर पंढरपुरात जीबीएसचे दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दोन्ही संशयित रूग्ण पंढरपूर शहरातील असून, त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिरजमध्ये 7 रुग्णांवर उपचार सुरू

पुणे, कराडमध्ये प्रत्येकी एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. 15 दिवसांत 6 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

जीबीएस हा नसांशी संबंधित एक गंभीर आजार

महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चा कहर सतत वाढत आहे. जीबीएस हा नसांशी संबंधित एक गंभीर आजार आहे. जीबीएस विषाणूमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या मृत्यूनंतर या विषाणूने आता मुंबईत एका रुग्णाचा बळी घेतला आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात व्हेंटिलेटरवर दाखल असलेल्या 53 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. मुंबईत जीबीएस संसर्गामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.

जीबीएस किती घातक?

जीबीएस हा एक दुर्मिळ आजार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती परिधीय नसांवर हल्ला करते. तसेच शरीराचे काही भाग अचानक सुन्न होतात. स्नायू कमकुवत होतात आणि गिळण्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. जीबीएसच्या गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्ण पूर्णपणे अर्धांगवायू होऊ शकतो. हा विकार वृद्ध प्रौढांमध्ये आणि पुरुषांमध्ये होण्याची शक्यता जास्त असते, जरी सर्व वयोगटातील लोकांना याचा त्रास होऊ शकतो.

Web Title: The risk of gb syndrome has increased in maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 07:59 AM

Topics:  

  • Guillain Barre syndrome
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.