मुंबई : आरे कॉलनीत रविवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आता मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आले आहे. मुंबईत जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅब तयार करण्यात आली आहे. या सोशल मीडिया लॅबकडून सामाजित तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येते. पोलिसांनी आतापर्यंत जातीय तेढ निर्माण करु शकणाऱ्या सुमारे ३००० पोस्ट डिलीट केल्या आहेत.
[read_also content=”आजपासून राज्यात पुढील दोन तीन दिवस उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/meteorological-department-warns-of-heat-wave-in-the-state-for-next-two-to-three-days-from-today-270346.html”]
रामनवमीपासून महाराष्ट्रात काही ठिकाणी हिंसाचार उसळला होता. याप्रकरणी मुंबईत पाच गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. तसेच दुसरा गुन्हा मालवणी पोलीस ठाण्यात तसेच गोरेगावच्या आरे कॉलनीत एकूण तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काल आरे कॉलनीतील गौतम नगर भागात काल रात्री दोन गटात तुंबळ राडा झाला. परिसरातील शिवमंदिरातील कळस यात्रेदरम्यान रात्री 8 वाजता दोन गटात वाद झाला आणि या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. या हाणामारीत 8 ते 10 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे.
[read_also content=”लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द https://www.navarashtra.com/state/supreme-court-cancels-bail-of-ashish-mishra-accused-in-lakhimpur-kheri-case-nrps-270382.html”]