Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ट्रॉमा ‘तील कामगारांचा संघर्ष सुरूच! कंत्राटदार बदलत राहिल्याने कामगारांच्या हक्कांवर गदा येत असल्याने नाराजी

गेल्या पाच-सहा महिन्यांपासून प्रश्न मांड्नही संघटित आवाज नसल्याने आपली दखल घेतली जात नसल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे प्रशासनाच्या बैठका आणि कंत्राटदारांच्या मनमानीत कामगारांचा प्रश्न मात्र अक्षरशः लटकलेला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 15, 2026 | 10:33 AM
'ट्रॉमा 'तील कामगारांचा संघर्ष सुरूच! कंत्राटदार बदलत राहिल्याने कामगारांच्या हक्कांवर गदा येत असल्याने नाराजी

'ट्रॉमा 'तील कामगारांचा संघर्ष सुरूच! कंत्राटदार बदलत राहिल्याने कामगारांच्या हक्कांवर गदा येत असल्याने नाराजी

Follow Us
Follow Us:

मुंबई: रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अहोरात्र पालिकेच्या जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील कामगारांनाच आपल्या हक्काच्या पगारासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मल्टिपर्पज लेबर आणि हाऊसकीपिंग विभागातील तब्बल १२४ कामगारांच्या वेतन, पीएफ आणि ईएसआयसीच्या प्रश्नांवर गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ठोस तोडगा निघालेला नाही. प्रशासनाकडून बैठकांवर बैठका होत असल्या, तरी कामगारांच्या हाताला मात्र अद्याप समाधानकारक काही लागले नाही. मल्टिपर्पज लेबरचे सुमारे ८० कामगार एका संस्थेच्या कंत्राटाखाली कार्यरत आहेत. मात्र, कामगारांना वेतन कशा पद्धतीने दिले जाते, याची माहिती कंत्राटदाराने अद्याप स्पष्ट केली नसून पीएफच्या पावत्याही मिळालेल्या नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Mumbai- Pune मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट! कनेक्टिंग लिंक 3 तासांसाठी राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

हाऊसकीपिंग विभागातील ४९ जणांची गरज असलेल्या जागी ४४ कामगार काम करत आहेत. या कामगारांचे एप्रिलचे वेतन रखडल्याची माहिती आहे. कंत्राट निश्चित नसल्याने मे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये कामगारांकडून डेली वेजेसवर काम करून घेतले जात असल्याचे सांगण्यात येते.66 महापालिका कामगार विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे शासनाच्या कायद्यानुसार किमान वेतन आणि १२ टक्के कर्मचाऱ्याचे आणि १३ टक्के महापालिकेने भरायचे आहेत. इएसआय, बोनस, सुरक्षेची साधने, मॅच्युरिटी अशा सगळ्या तरतुदी आहेत. समान वेतनाचा कायदा असून तसं कामगारांना मिळत नसल्यास कामगारावर अन्याय आहे, अशी माहिती – प्रदीप नारकर, सहा. सरचिटणीस, म्युनिसिपल मजदूर युनियन यांनी दिली आहे.

Mumbai News: मुंबईतील लोकल स्थानकांवर मिळणार ‘गार वारा’! पश्चिम रेल्वेवर मोठ्या आकाराच्या एचव्हीएलएस पंख्यांची संख्या ९६ वर

सुरुवातीला रोख स्वरूपात पैसे देण्यात आले, तर आता बँक खात्याची माहिती घेण्यात आली आहे. मात्र, महिन्याचा पगार देण्याऐवजी १५ ते २० दिवसांनी वेतन दिले जात असल्याची कामगारांची तक्रार आहे. वारंवार कंत्राटदार बदलल्यास पीएफ, ईएसआयसीसारख्या मूलभूत कामगार हक्कांपासून वंचित राहण्याची भीती कामगारांनी व्यक्त केली आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून प्रश्न मांड्नही संघटित आवाज नसल्याने आपली दखल घेतली जात नसल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे प्रशासनाच्या बैठका आणि कंत्राटदारांच्या मनमानीत कामगारांचा प्रश्न मात्र अक्षरशः लटकलेला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The struggle of trauma center workers continues dissatisfaction arises as the frequent changing of contractors infringes upon the workers rights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Government Hospital
  • Hospital News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
1

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
2

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
3

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
4

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.