Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरात ‘कूल-कूल’; 8 अंशांपर्यंत घसरला तापमानाचा पारा, घराबाहेर पडणे झालं कठीण

गेल्या चार दिवसांपासून पारा किमान पातळी गाठत आहे. त्यामुळे नागपूरकर जॅकेट, स्वेटरबंद झाले आहेत. कमाल तापमान २९-३० दरम्यान असल्याने दुपारी नागरिकांना किंचित दिलासा मिळत असला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 11, 2025 | 07:55 AM
विदर्भात नागपूर सर्वात 'कूल'

विदर्भात नागपूर सर्वात 'कूल'

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसा उन्ह तर सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका जाणवत आहे. असे असताना नागपुरात सकाळच्या वातावरणातील गारवा चांगलाच वाढत आहे. किंबहुना विक्रमाकडे पुढे जात असल्याचे चित्र आहे. हवामान खात्यानुसार, विदर्भात नागपूरची बुधवारी सर्वाधिक थंड शहर म्हणून नोंद झाली. या मोसमातील सर्वाधिक कमी ८ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते.

गेल्या चार दिवसांपासून पारा किमान पातळी गाठत आहे. त्यामुळे नागपूरकर जॅकेट, स्वेटरबंद झाले आहेत. कमाल तापमान २९-३० दरम्यान असल्याने दुपारी नागरिकांना किंचित दिलासा मिळत असला तरी सायंकाळी थंडीत वाढ होत असल्याने शेकोट्याही दिसत आहे. नागपूरनंतर गोंदिया ८.४ अंशासह दुसऱ्या तर यवतमाळ ८.८ अंशासह तिसरे थंड शहर ठरले. गेल्यावर्षी १४ डिसेंबरला ७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. त्यामुळे आजची तारीख लक्षात घेता थंडीने गेल्यावर्षीचा विक्रम मोडित काढण्याकडे वाटचाल सुरू केल्याचे दिसून येत आहे.

हेदेखील वाचा : दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत थंडीची लाट; तापमानाचा पारा 0°C पर्यंत घसरला

डिसेंबरच्या शेवटी तापमान ७ ते ८० अंश सेल्सिअस असते. ३० डिसेंबर २०१८ रोजी नागपूरचे तापमान ३.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते, जे मागील ५० वर्षांतील सर्वात कमी तापमान होते. परंतु, यंदा डिसेंबरच्या सुरुवातीलाच किमान तापमान ८ पोहोचल्याने अंशांपर्यंत नागपूरकरांमध्ये हुडहुडी भरली आहे. बुधवारी दिवसाला थोडे उन्ह तापले. त्यामुळे कमाल तापमान बुधवारी ३०.२ अंशापर्यंत गेले. मात्र, सायंकाळ होताच पुन्हा थंडीने जोर धरला.

रात्री घरातून बाहेर पडणे झाले कठीण

थंडीमुळे नागरिकांचे घरातून निघणेही बंद झाले. घरांमध्ये नागरिकांनी हिटरचा वापर सुरू केला. त्यातही स्वेटर, मफलर, टोपऱ्यांमध्ये अनेकांनी स्वतःला बंद करून घेतली. सायंकाळनंतर शहरातील विविध चौकांमध्ये, ऑटो स्टँडवर नागरिक शेकोटीजवळ हात शेकताना दिसून आले.

गारठा आणखीन वाढण्याचा अंदाज

देशातील अनेक भागात वातावरण बदल झाला असून, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये पावसाचे ढग यापूर्वी होते. त्यातच राज्यात तीन ते चार दिवसांत गारठा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पाऊस इतका जोरदार सुरू झाला आहे की, मागील सर्व विक्रम मोडले आहेत. दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषण वाढत आहे. सरासरी एक्यूआय ३०४ वर आहे, अनेक ठिकाणी ४०० च्या जवळपास नोंद झाल्याचे पाहिला मिळाले.

Web Title: The temperature has dropped to 8 degrees celsius in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 07:50 AM

Topics:  

  • Climate Change
  • Maharashtra Weather
  • Nagpur News
  • Weather Update

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
1

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक
2

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’
3

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
4

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.