पोलिस निरीक्षकाच्या उशाजवळील साहित्याची चोरी; तब्बल ‘इतक्या’ हजारांचा ऐवज लंपास
डाॅग स्काॅड आरपीएफ बॅरेकमधील रूममध्ये झोपलेल्या पोलीस निरीक्षकाच्या उशाजवळील दोन मोबाइल आणि रोख रक्कम असा ३७ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याबाबत आर.पी. एफ. पोलीस निरीक्षक पोरसकुमार नवलकिशोर चौधरी यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
कुर्डुवाडी : डाॅग स्काॅड आरपीएफ बॅरेकमधील रूममध्ये झोपलेल्या पोलीस निरीक्षकाच्या उशाजवळील दोन मोबाइल आणि रोख रक्कम असा ३७ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याबाबत आर.पी. एफ. पोलीस निरीक्षक पोरसकुमार नवलकिशोर चौधरी यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोरसकुमार नवलकिशोर चौधरी हे आरपीएफ कुर्डुवाडी येथे पोलीस निरीक्षक या पदावर दिनांक ५ मे पासून कार्यरत आहेत. दिनांक २४ रोजी रात्री ८ वाजता वर्कशॉप समोरील डॉग स्कॉड आरपीएफ बॅरेक येथील रुमवर गेले. मध्यरात्री दिनांक २५ रोजी रात्री १.१० वाजताच्या दरम्यान त्यांच्या मोबाईलवरुन आरपीएफ व्हॉटसअप ऑफिशल ग्रुपवर नियंत्रण कक्षकडून आलेली माहिती पाठवून उशालाच दोन्ही मोबाइल ठेऊन साधारणता रात्री २ वाजता झोपी गेले.
झोपतेवेळी त्यांनी उकाड्याने हैराण होत असल्याने दरवाजा बंद केला नव्हता. पहाटे ३.३० वाजण्याच्या दरम्याने झोपेतून जागे झाले असता त्यांना उशाला ठेवलेले दोन्ही मोबाईल गायब झाल्याचे आढळले. तसेच बॅगमधील पॉकेट उचकटून रोख रक्कमही चोरीस गेल्याचे त्यांना समजले.
Web Title: Theft of material near the police inspectors pillow nrdm