Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान

काहींनी तर अरेरावीची भाषा केली. मात्र, आमची ती संस्कृती नाही. केवळ राजकारण म्हणून कारखान्याकडे बघता. कारखाना वाचला पाहिजे, टिकला पाहिजे असे म्हणता त्यासाठी आम्ही सर्व सभासद शेतकरी ऊस उत्पादक समर्थ आहोत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 22, 2026 | 12:52 PM
विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत

विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत

Follow Us
Follow Us:

मसूर : सह्याद्री कारखानाच्या सर्वसाधारण सभेला चांगली परंपरा आहे. वार्षिक सभा बरोबर दोन वाजता सुरू करण्यात झाली होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या श्रद्धांजलीचा ठराव सुरू असताना विरोधकांनी गोंधळास सुरुवात केली. सभेत प्रश्न असतात. खुलासे आपण करतो. या स्थितीत विरोधकांनी बाजार मांडला. या गोंधळात सह्याद्रीच्या सभासदांनी संयम ठेवला. विरोधकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरेच ऐकायची नव्हती तर केवळ नावाप्रमाणेच उत्तुंग चाललेल्या सह्याद्री कारखान्यावर फक्त टीका करायची होती. प्रतिसभा घेऊन प्रक्षोभीत भाषणे करता, अनेक वल्गना करता. त्याला योग्य वेळी उत्तर देऊच.

काहींनी तर अरेरावीची भाषा केली. मात्र, आमची ती संस्कृती नाही. केवळ राजकारण म्हणून कारखान्याकडे बघता. कारखाना वाचला पाहिजे, टिकला पाहिजे असे म्हणता त्यासाठी आम्ही सर्व सभासद शेतकरी ऊस उत्पादक समर्थ आहोत. चांगल्या आदर्शवत चाललेल्या सह्याद्रीकडे कोणी वाकड्या नजरेने बघू नका. उत्तर द्यायला सह्याद्रीचे पण वाघ आहेत, असा खणखणीत इशारा माजी सहकार मंत्री व सह्याद्री कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखान्याच्या 53 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक राजेंद्र भगवानराव पाटील व त्यांच्या पत्नी मनीषा राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना विरोधकांना दिला.

सह्याद्रीच्या सभेत घोषणाच घोषणा; 15 मिनिटांत सभा गुंडाळली; ठरावावेळी घोरपडे-कदम समर्थकांची घोषणाबाजी

बाळासाहेब पाटील म्हणाले, साखर कारखाना आहे म्हणून सर्व गोष्टी अहवालात समोर येतात. मात्र, इतर कारखान्यांचे कर्ज बघा, त्यांचा उत्पादन खर्च बघा, यावर्षी गतवर्षीपेक्षा उत्पादन खर्च कमी केला आहे. घरच्या कारभाऱ्याला तुम्ही सर्व सभासदांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने घेतलेल्या काही निर्णयांचे अभिनंदन करत एमएसपी दरवाढ व इथेनॉल दरवाढीसह कारखानदारांच्या इतर प्रश्नाकडे शासनाने लक्ष द्यावे. मोठ्या कामासाठी कर्ज काढावे लागते. विस्तार वाढीसाठी कर्ज काढले आहे. त्यापैकी 83 कोटी कर्जाची परतफेड केली आहे.

वारसनोंदी संदर्भात बोलताना ते म्हणाले, सुमारे 2200 प्रकरणापैकी 1300 वारसनोंदी पूर्ण झाले आहेत. मात्र, काही कौटुंबिक तक्रारींमुळे उर्वरित वारस नोंदी झालेले नाहीत. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने उभारलेला हा सह्याद्री कारखाना त्यांच्या विचारापासून दूर जाणार नाही. शासनाचा 15 ऑक्टोबरला कारखाने सुरू करण्याचा निर्णय चुकीचा आहे. साधारणपणे 15 नोव्हेंबर ते 15 मार्च यादरम्यान साखर परिपक्व होते. त्या अगोदर ऊस तोडला गेला तर सभासदांच्या बरोबरच राष्ट्राचे नुकसान होते.

माझ्यावर राजकीय वैयक्तिक टीका

सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करत असताना माझ्यावर राजकीय वैयक्तिक टीका केली जात आहे. त्याला त्या-त्या त्यावेळी उत्तर देऊ. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे, स्व. पी. डी. पाटील साहेबांच्या विचाराने मी घडलो आहे. त्यामुळे त्यामुळे सभासद हिताचेच काम करू, असा विश्वास व्यक्त करत यावर्षी अकरा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Web Title: There are tigers of sahyadri to give a fitting reply to the opposition says balasaheb patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • balasaheb patil
  • political news
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव
1

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
2

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
3

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
4

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.