पुणे : लवकरचं शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाची घडी निट बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच मंत्री मंडळात आपल्या संधी मिळावी यासाठी अनेक दिग्गज सरसावले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये माधुरी मिसाळ, राहुल कुल आणि महेश लांडगे ही तीन नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आली आहेत.
राहुल कुल यांनी याआधीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच जिल्ह्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि शहर असा समतोल साधण्याची शक्यता मंत्रिमंडळ विस्तारात केली जाणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. राज्यात कोणाला मंत्री करावे, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ठरवतील. येत्या काही दिवसांत हा विस्तार व्हावा, अशी मला अपेक्षा असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले. त्याचवेळी बच्चू कडू यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराचा दावा केला होता.
अनिल बाबर, भरत गोगावले, संजय रायमुलकर, अपक्ष आमदार बच्चू कडू, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, योगेश कदम यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासूनच अपक्ष आमदार बच्चू यांचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत होतं. बच्चू कडू यांनीही याबाबत अनेकदा आपलं मत बोलून दाखवलं.
दरम्यान याआधीही उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये बच्चू कडू शालेय शिक्षण राज्यमंत्री होते. त्यामुळे पुन्हा संधी मिळावी, असं त्यांनी वारंवार बोलून दाखवलं. जाहीर सभांमध्येही त्यांनी आपली खंत बोलून दाखवली. आता अखेर बच्चू कडू यांना संधी मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.