Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजना खरचं बंद होणार? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

लाडक्या बहिणींनीच सरकारला प्रश्न विचारायला हवेत. ज्या लाडक्या बहिणींचे मतदान १५०० रुपयांना विकत घेतले गेले, त्या मतांची किंमत आता ५०० रुपयांवर आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 16, 2025 | 02:34 PM
एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री होईन

एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री होईन

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी  ‘लाडकी बहीण’ योजनेतील आर्थिक मदत कमी करण्यात आल्याच्या बातम्यांवरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी सरकारवर टीका करताना “शासनाकडे निधी नाही, म्हणून योजना बंद करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोपा केला आहे.  मात्र या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत ‘लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.

अजित पवार काय म्हणाले?

मंगळवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, “लाडकी बहीण’ योजना रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे आणि ती योजना सुरूच राहील.

दरम्यान, या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात या योजनेचे महत्त्वाचे योगदान होते, असा दावा सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आला आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा समावेश आहे.

LA Olympics २०२८ : १२८ वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिंपिकमध्ये पुनरागमन, अमेरिकेत होणार आयोजन, जय शाहांची घोषणा.

काही महिलांना ५०० रुपयांची मदत का?

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीदेखील यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “ज्या महिलांना अन्य योजनांअंतर्गत आधीच १,००० रुपयांची मदत मिळते, त्या ७.७४ लाख लाभार्थ्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत केवळ ५०० रुपये दिले जातील. म्हणजेच, योजनेची एकूण मदत रक्कम पूर्वीप्रमाणे १,५०० रुपयेच आहे, परंतु जे आधीपासून इतर योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना ‘डबल बेनिफिट’ टाळण्यासाठी ‘लाडकी बहीण’ अंतर्गत थोडीशी कपात करण्यात आली आहे.

विरोधकांच्या आरोपांचे खंडन

योजनेतील या बदलावरून विरोधकांनी सरकारवर आर्थिक असमर्थतेचा ठपका ठेवला आहे. मात्र, अजित पवार आणि अदिती तटकरे यांनी हा आरोप फेटाळून लावत योजनेची अंमलबजावणी सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

PBKS vs KKR : युजवेंद्र चहल ठरला केकेआरविरुद्ध जायंट किलर, प्रीती झिंटाने मारली ‘आनंदाची मिठी’, व्हिडिओ व्हायरल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “लाडक्या बहिणींनीच सरकारला प्रश्न विचारायला हवेत. ज्या लाडक्या बहिणींचे मतदान १५०० रुपयांना विकत घेतले गेले, त्या मतांची किंमत आता ५०० रुपयांवर आली आहे. उद्या ती शून्यावर येईल. राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही पैसे उपलब्ध नाहीत. हे राज्य आता आर्थिकदृष्ट्या चालवणे सोपे राहिलेले नाही. कारण गेल्या तीन-साडेतीन वर्षांत राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे.” या वक्तव्यानंतर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Web Title: These women will not get the benefit of ladki bahin yojana ajit pawar made it clear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • Aditi Tatkare
  • ajit pawar
  • Ladki Bahin Yojna

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
3

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
4

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.