Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांनी स्वतःची लायकी ओळखावी आणि मगच बोलावे, आमदार नितेश राणेंची टीका

नरेंद्र मोदी यांचा २ हजारची बंद पडलेली नोट असा उल्लेख संजय राऊत यानी केला, ह्याचा मालक आता बंद पडत चालला आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 13, 2024 | 02:28 PM
पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांनी स्वतःची लायकी ओळखावी आणि मगच बोलावे, आमदार नितेश राणेंची टीका
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु आहे. याचदरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे एकमेकांवर टीका करण्यासाठी एकही साधी शोधात नाही. आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली या परिषदेत त्यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी ढबु पैसा हा सुरु केलेलं नाणे आहे. त्याचे महत्व औरंगजेबाचा वंशज असलेल्या संजय राऊत यांना कळणार नाही. आमच्या चंद्रशेखर बावनकुळे यांना बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंच्या कामगाराने करू नये. तुझ्या मालकाच्या नाण्याची किंमत समाजात राहिलेली नाही. पहिले स्वतःची आणि मालकाची बाजारातील किंमत समजून घे आणि मग टीका करा. पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांनी स्वतःची लायकी ओळखावी आणि मगच बोलावे असा इशारा भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी दिला.

पुढे ते म्हणाले, तुमच्या सारखी इटालियन नान्या समोर आम्ही लाळ चाटत नाही. पाय चाटत नाही. चाटून चाटून तुमच्या जिभेला हाड राहिलेलं नाही. ती जीभ कमी वळवळेल तेवढा कमी त्रास राऊत आणि तुझ्या मालकाला होईल. तुझ्या मालकाची शोले चित्रपट मधील हसराणी सारखी अवस्था आहे. मालकासोबत काही उरलेला नाही. दुसऱ्यांवर टीका करण्यापूर्वी मालकाची अवस्था बघा. सिल्वर ओकची उबाठा नेमकं काय आहे,याच विश्लेषण आम्ही करायचं का? हाताला गजरा लाऊन उबठाचा नंगा नाच कसा पहिला जातो ते दाखवयच का? नरेंद्र मोदी यांचा २ हजारची बंद पडलेली नोट असा उल्लेख संजय राऊत यानी केला, ह्याचा मालक आता बंद पडत चालला आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या मुळे तुझ्या मालकांचे १८ खासदार निवडून आले. इंडिया आघाडी मुस्लिम लीगच पिल्लू आहे का? ह्याच उत्तर द्या आणि मग आमच्यावर टीका करा. उद्धव ठाकरे याचा कोणता नातेवाईक अमित शहा यांच्या घराबाहेर असतो याची माहिती प्रकाश आंबेडकर यांना असेल म्हणून ते घाबरले. प्रकाश आंबेडकर यांनी मोदींचे नाव घेतले नाही तर त्यांच्या सभेला कोणी येणार नाही. सभेत गर्दी करण्यासाठी अस बोलावं लागत, अशी टीका नितेश राणे यांनी केली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारी बद्दल बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, तुमच्या मनात संभ्रम आहे. आमच्यात नाही, आम्ही सगळेजण महायुती म्हणून कामाला लागलेलो आहोत. ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. लोकांच्या मनातला उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे असणार असे समजा.

ठाकरेंची जेव्हा जेव्हा कणकवलीत सभा झाली आम्हाला मतदान जास्त झाले. २०१९ मध्ये सभा घेतली तेव्हा २०१४ च्या तुलनेत मतदान वाढले. मला जेवढे जास्त विरोधक शिव्या घालतील तेवढी जास्त मते मिळतात त्यामुळे या तुमचं स्वागत आहे, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली. आईंचा महिलांसोबत कायमच संवाद असतो. माझ्या आई निलम राणे कुठलीही निवडणूक असेल तर त्या महिलांसोबत संवाद साधत असतात. जेव्हा राणे २००४ मध्ये राज्यात प्रचारात व्यस्थ होते, तेव्हा आईनेच विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व केले होते.त्यामुळे सामाजिक,राजकीय विषयात त्यांची पीएचडी झालेली आहे.

आचारसंहितेचा भंग वाटत असेल तर तक्रार करा – नितेश राणे
तुम्हाला माझे वक्तव्य आचार संहितेचा भंग वाटले तर तक्रार करावी. मी अधिकारवाणीने माझ्या कार्यकर्त्यांशी बोललो. माझ्या सरपंचांना वाईट वाटले नाही. संपलेल्या व व्हेंटिलेटरवर असलेल्या खासदारांनी बोलू नये. माझी कामाची पद्धत जशी आहे तसे मी ABC असे ग्रुप करून निधी देणार आहे. राऊतानी स्वतःच्या सरपंचांना किती निधी दिला.त्यांना विकास करण्यासाठी कसा न्याय दिला, तो मांडावा. मी माझ्या विचारांच्या सरपंचांना कसा आणि किती निधी दिला ते सांगतो.त्यामुळे विनायक राऊत यांना त्याच्या प्रश्नांची उत्तरे ४ जूनला मिळतील. आमच्या घरात काय चाललंय हे पाहण्यापेक्षा तुमचे मतदार खळा बैठकीला का येत नाहीत, याचा विचार करा. किमान ५ लाख मतांनी पराभवाची तयारी ठेवा विनायक राऊतला पाडण्यासाठी आम्ही तयार आहोत. कोण कोणाला घाबरतो ते लवकरच समजेल,असा इशारा आ.नितेश राणे यांनी केला.

Web Title: Those who criticize the prime minister should know their worth and then speak says mla nitesh rane maharashtra politics maharashtra political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2024 | 02:28 PM

Topics:  

  • BJP
  • kankavali
  • Loksabha Elections
  • MLA Nitesh Rane
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.