मुंबई : राज्यात उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत होतान दिसत आहे. इतकेच नाहीतर बहुतांश धरणांमधील पाणीसाठाही आटत चालला आहे. त्यामुळे राज्यात पाणीपुरवठा (Water Tanker) करणाऱ्या टँकरच्या संख्येने विक्रमी उच्चांक गाठला आहे. राज्यातील 11 हजारांहून अधिक वाड्या-वस्त्यांना तब्बल 3700 हून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
राज्यात गेल्या वर्षी फक्त 1308 वाड्या आणि गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यंदाची परिस्थिती त्याहून बिकट आहे. सध्या 3072 गावे आणि 7931 वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे तो केवळ पिण्यासाठी असून, जनावरांना पाणी मिळणे अत्यंत कठीण आहे. परिणामी, पशुधन संकटात आले आहे.
नाशिक, संभाजीनगरात मोठी कमतरता
नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात पाण्याची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल १,२७८ गावे आणि ५०५ वाड्या तर नाशिक विभागात ७९२ गावे आणि २,७१३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे विभागातील ६४९ वाड्या आणि ३,८८७ गावांना टँकरद्वारे पाणीपुवरठा सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नांदगाव तालुक्यात ७७ टँकरद्वारे १७२ फेर्या , येवला तालुक्यात ५७ टँकरद्वारे ११८ फेर्या, मालेगावमध्ये ४९ टँकरद्वारे ९८ फेर्या, सिन्नरमध्ये ४४ टँकरद्वारे १२४ फेर्या, बागलाणमध्ये ४२ टँकरद्वारे ६३ फेर्या होत आहेत.
असा सुरु आहे जिल्हावार टँकरने पाणीपुरवठा