mantralaya
मुंबई : देशाच स्वातंत्र दिन (Independence Day 2023) अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभुमीवर देशभरात सुरक्षा यंत्रणेचं विशेष लक्ष लागून राहिलेलं असतं. अशा परिस्थितीत मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मंत्रालयात धमकीचा फोन (Threat Call In Mantralaya) आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. फोन करणाऱ्याने एक-दोन दिवसात अतिरेकी कारवाई (Terrorist Activities) करण्याची धमकी दिली. या याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला कांदिवली येथून अटक केली आहे.
[read_also content=”चांद्रयान-३ चंद्रावर उतरू शकले नाही तर काय होणार? इस्रो जवळ आहे प्लॅन-बी! जाणून घ्या https://www.navarashtra.com/india/what-if-chandrayaan-3-will-not-succeed-isro-have-the-plant-b-nrps-442210.html”]
मिळालेल्यी माहितीनुसार, मंंत्रालयातील नियंत्रण कक्षातली लॅंडलाईनवर सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा फोन आला. फोन येताच मुंबई पोलीस सतर्क झाले. या याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फोन करणाऱ्याचा शोध घेतला आहे. पोलिसांनी ६१ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. प्रकाश किशनचंद खेमानी असे आरोपीचे नाव आहे. आरोपवी आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आरोपीला दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आरोपीने हा फोन कोणत्या उद्देशाने केला? खरंच काही अतिरेकी कारवाईचा कट आहे की केवळ दहशत माजवण्याच्या उद्देशाने हा फोन करण्यात आला? याचा शोध घेण्याचं एक मोठं आव्हान आता मुंबई पोलिसांसमोर आहे.