Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार महिन्यात भाजपच्या तीन नेत्यांचे निधन; पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाला करावे लागणार विशेष प्रयत्न

गेल्या चार महिन्यात भाजपचे (BJP Leaders) तीन नेत्यांचे दुर्धर आजाराने निधन झाल्याने पक्षाचे राजकीयदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. ही नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाला अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2023 | 09:06 PM
चार महिन्यात भाजपच्या तीन नेत्यांचे निधन; पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाला करावे लागणार विशेष प्रयत्न
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गेल्या चार महिन्यात भाजपचे (BJP Leaders) तीन नेत्यांचे दुर्धर आजाराने निधन झाल्याने पक्षाचे राजकीयदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. ही नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाला अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.

डिसेंबर महिन्यात कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. काही दिवसांतच चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. आता खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. भाजपचे दोन विद्यमान आमदार आणि एक विद्यमान खासदार यांच्या निधनाने पक्षात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विशेषत: खासदार बापट यांच्या निधनामुळे शहर पातळीवर आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची उणीव भाजपला पुढील काळात असेल.

खासदार बापट यांच्यानंतर शहराच्या राजकारणावर प्रभाव आणि पकड निर्माण करणारे नेतृत्व हे शहर भाजपमध्ये दिसत नाही. किंबहुना हीच परीस्थिती इतर पक्षांतही दिसत आहे. काँग्रेसचे तत्कालीन खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचा शहराच्या राजकारणावर चांगला पगडा होता. त्यांच्यानंतर खासदार बापट यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

मुक्ता टिळक यांचं 22 डिसेंबरला निधन

मुक्ता टिळक यांची ५७ व्या वर्षी प्राणज्योत प्रदीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली होती. मुक्ता टिळक कॅन्सरशी लढा देत होत्या. परंतु, २२ डिसेंबर २०२२ रोजी त्यांची झुंज अखेर अयशस्वी ठरली. मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांची पणतू सून होत्या. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या विद्यमान आमदार होत्या. त्या ४ वेळा नगरसेवक राहिल्या होत्या. मुक्ता टिळक यांनी सन २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले होते. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअर अ‍ॅम्ब्युलन्सनं नेण्यात आलं होतं. त्यांच्या प्रतिमेचा उपयोग पक्षाला नेहमीच होत असे.

लक्ष्मण जगताप यांचं 59 व्या वर्षी निधन

लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी ५९ व्या वर्षी निधन झाले होते. १९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. २००३-०४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला. २०१४ ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला.

जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकारणात जगताप यांची भूमिका ही नेहमीच महत्वाची ठरली होती. या तीन नेत्यांची पोकळी भरून काढण्याचे आव्हान आता भाजपसमोर आहे.

Web Title: Three bjp leaders died in four months the party will have to make special efforts to fill the gap nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2023 | 09:05 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Congress
  • Girish bapat
  • maharashtra news
  • Mukta Tilak
  • political news

संबंधित बातम्या

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
1

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
4

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.