
अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस; नगराध्यक्षपदासाठी ६०, नगरसेवकपदासाठी ९८० अर्ज दाखल
मागील सात दिवसांपासून नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी युती आणि आघाडीबाबत निर्णय लांबल्याने सर्व राजकीय पक्षांच्या इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परिणामी सात दिवस होऊनही काही इच्छुक उमेदवार हे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सोमवारी नामांकन अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत असल्याने पक्षीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. यामुळे शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान रविवारी सातव्या दिवशी ३२ तर नगराध्यक्षपदासाठी नगरसेवकपदासाठी ५५५ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहे.
नामांकन अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर दाखल झालेल्या अर्जाची १८ नोव्हेंबरपर्यंत छाननी होणार आहे. त्यानंतर वैध अर्जाची यादी प्रसिध्द झाल्यानंतर उमेदवारांना माघारीसाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदत राहणार आहे. यानंतर मात्र खऱ्या अथनि निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार होणार
असून राजकीय पक्षांना बंडखोरी थोपवणे तसेच एकच उमेदवार देण्यासाठी मोठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर निवडणुकांना मुहूर्त लागला आहे. यामुळे इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे. एकीकडे युती आघाडीबाबतच्या राजकीय घडामोडी कडे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे इच्छुक उमदेवारांची सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत असल्याने धावपळ सुरु झाली आहे.
निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना इलेक्ट्रोनिक्स जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी जिल्हातस्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास संबंधित उमेदवारावर आचारसंहिता भागांची कारवाई केली जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
समितीमध्ये पोलीस अधीक्षक किंवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला अपर जिल्हाधिकारी अथवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित तहसलीदार अथवा नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्यकार्यकरी अधिकारी हे सदस्य तर माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. जाहीरात प्रसारनापूर्वी प्रमाणित करून घेण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहणार आहे.
Ans: 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे.
Ans: एकूण मतदार - 1 कोटी 7 लाख 3 हजार 576, महिला मतदार - 53 लाख 22 हजार 870
Ans: अ वर्ग - अध्यक्षपद - 15 लाख नगरसेवक - 5 लाख