अजित पवारांना अंधारात ठेवून राष्ट्रवादीने लढवली बिहारची निवडणूक
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. परंतु, यातील एकाही उमेदवाराला दखलपात्र कामगिरी करता आलेली नाही. सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले, राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांना ५०० मतेही मिळाली नाहीत.
सासाराम विधानसभा मतदारसंघात आशुतोष सिंह यांना केवळ ११२ मते पडली. जिथे नोटालाही ३७० हुन अधिक मते पडली आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, उमेदवाराला मतदारसंघातील एखाद्या एकूण मतांच्या १६ टक्के मते पडली नाहीत तर त्याचे डिपॉझिट जप्त होते.
अजित पवार गेल्या काही दिवसांपासून अडचणीतून जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत शरद पवार गटासोबत आघाडी करण्याची चर्चा सुरू होताच पार्थ पवार यांचे जमीन घोटाळा प्रकरण चव्हाट्यावर आले. त्याआधी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाची अडचण झाली होती.






