Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आजची सुनावणी पूर्ण; उद्या पुन्हा होणार सुनावणी, जाणून घ्या कोर्टात काय झालं?

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आजची सुनावणी संपली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) यांनी परस्परांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर ही सुनावणी झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 15, 2023 | 04:38 PM
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आजची सुनावणी पूर्ण; उद्या पुन्हा होणार सुनावणी, जाणून घ्या कोर्टात काय झालं?
Follow Us
Follow Us:

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आजची सुनावणी संपली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) यांनी परस्परांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर ही सुनावणी झाली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयात वकिलांनी बाजू मांडली. त्यानंतर आता याप्रकरणाची सुनावणी सदस्यांच्या घटनापीठाकडून सात सदस्यांच्या घटनापीठाकडे जाईल का? याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे वकील हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी बाजू मांडल्यानंतर राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्याने सुनावणी स्थगित करण्यात आली. त्यामुळे सत्तासंघर्षाची सुनावणी पाच सदस्यांच्या घटनापीठाकडून सात सदस्यांच्या घटनापीठाकडे जाईल का? याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच त्यांनी नबाम रेबिया प्रकरणावरही महत्वाचं भाष्य केलं. याबरोबरच सत्तासंघर्षाची सुनावणी सात सदस्यीय घटनापीठापुढे घेण्यात यावी, अशी मागणीही ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली.

उद्या पुन्हा सुनावणी

शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी नवे मुद्दे मांडत राज्यातील सत्तासंघर्षाचा घटनाक्रमच सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला. अजय चौधरी यांची गटनेते पदाची निवड बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचा दावाही हरीश साळवे यांनी केला.

शिंदे यांचं सरकार घटनात्मक

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी बहुमताचा दावा केला. एकनाथ शिंदे हे राज्याचे कायदेशीर मुख्यमंत्री आहेत. कारण शिंदे यांनी कायदेशीरपणे बहुमत सिद्ध केलं आहे. त्यांना बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा होता. शिंदे गट आणि भाजपकडे बहुमत असल्यानेच ते मुख्यमंत्री झाले, असेही साळवे यांनी सांगितले.

Web Title: Todays maharashtra political crisis hearing completed in supreme court nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2023 | 04:35 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Political Crisis
  • political news
  • Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.