
फिनिक्स मॉल परिसरात मध्यरात्री थरार! सिमेंटचा गट्टू तरुणाच्या डोक्यात घातला अन्...
नेमकं काय घडलं?
ऋतिक एका खासगी कंपनीत कामाला आहे. गुरुवारी रात्री तो आपला मित्र प्रशांत याच्यासोबत फिनिक्स मार्केट सिटी परिसरातील एका पबमध्ये गेला होता. पबमध्ये दोघंही डान्स करत होते. रात्री दहा वाजताच्या सुमारास ऋतिकने डान्स करताना आपला शर्ट काढला आणि हवेत फिरवायला सुरुवात केली. यावरूनच आरोपींसोबत त्याचा वाद झाला. काही वेळानंतर ऋतिक आणि प्रशांत पबमधून बाहेर पडले. मात्र, हा वाद आरोपींच्या अजूनही डोक्यात होता. त्यांनी ऋतिकला गाठून शिवीगाळ केली. एवढ्यावरही न थांबता त्यांनी रस्त्यावर पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून त्याच्या डोक्यात घातला. इतकंच नाही, तर यानंतर झाडाच्या फांदीने त्याला मारहाण केली. यात ऋतिक जखमी झाला. त्याने पोलिसात धाव घेतली. विमाननगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी महिलेसह चौघांनाही अटक केली.
कौटुंबिक वादातून वडिलांचा फावडे घालून खून
कौटुंबिक वादातून मुलाने ८० वर्षांच्या वडिलांच्या डोक्यात फावडे घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत घडली आहे. या प्रकरणी मुलाला पर्वती पोलिसांनी अटक केली. जगन्नाथ धोंडू होडे (वय ८०, रा. वेताळबाबा मंदिराजवळ, जयभवानीनगर, जनता वसाहत, पर्वती) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रणी मुलगा रामचंद्र (वय ४६) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलीस शिपाई धनंजय रौंदळ यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २ नोव्हेंबर रोजी जगन्नाथ आणि त्यांचा मुलगा रामचंद्र यांच्यात कौटुंबिक वाद झाला. वादातून मुलगा रामचंद्र याने वडिलांच्या डोक्यात घरातील फावडे घातले. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खिलारी तपास करत आहेत.
Ans: ऋतिक कोंडे हा मित्रासोबत पबमध्ये डान्स करत होता. त्याने डान्स करताना शर्ट काढून हवेत फिरवल्यामुळे आरोपींसोबत त्याचा वाद झाला.
Ans: आरोपींनी ऋतिकला शिवीगाळ करून रस्त्यावर पडलेला सिमेंटचा गट्टू त्याच्या डोक्यात मारला. त्यानंतर झाडाच्या फांदीनेही मारहाण केली.
Ans: जगन्नाथ होडे यांचा मुलगा रामचंद्र (वय ४६) याने कौटुंबिक वादातून घरातील फावडे वडिलांच्या डोक्यात मारून त्यांचा खून केला. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी त्याला अटक केली.