
पुण्यात ऐन दिवाळीत गुन्हेगारीचा थरार! दोन वेगवेगळ्या घटनांत तरुणांवर शस्त्राने हल्ले; नेमकं काय घडलं?
याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शुभम शरद शिंदे (वय २७, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रतन विठ्ठल खत्री (वय २४), सोमा गायकवाड, पंकज तिवारी, आकाश जमादार यांना अटक करण्यात आली. तर बंटी म्हस्के, समीर विद्यागज, संघर्ष सावंत, शैलेश भंगे, तन्मय सोनवणे यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसंच्या माहितीनुसार, शुभम शिंदे हा पानपट्टी चालवितो. आरोपींशी त्याच्या वाद झाला होता. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास कोंढव्यातील साळवे गार्डनजवळ आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. सहायक पोलीस निरीक्षक नेवसे तपास करत आहेत.
येरवड्यातील मुळा-मुठा नदीपात्रातील चिमा घाटावर दारू पित असताना झालेल्या वादातून एका तरुणावर फुटलेल्या बाटलीने वार करण्यात आले. या घटनेत तरुणाच्या कानाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी अर्जुन दशरथ म्हस्के (वय २४), शादाब जहाँगीर बांगी (वय ३१, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार इस्माइल शेरेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय विजय राजुरे (वय २५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत राजुरे याने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि तक्रारदार राजुरे हे मित्र आहेत. शुक्रवारी सायंकाळी येरवड्यातील चिमा घाट परिसरात दारू पित होते. त्या वेळी राजुरे याने बांगी याचा मोबाइल संच ताब्यात घेऊन पाहिला. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपींनी दारूची बाटली फोडली. फुटलेल्या बाटलीने राजुरे याच्यावर वार केले. सहायक पोलीस निरीक्षक विभुते तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : फिनिक्स मॉल परिसरात मध्यरात्री थरार! सिमेंटचा गट्टू तरुणाच्या डोक्यात घातला अन्…
Ans: शुभम शरद शिंदे याचा आरोपींसोबत पूर्वीपासून वाद होता. याच वैमनस्यातून साळवे गार्डनजवळ त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले.
Ans: दारू पिताना अक्षय राजुरे याने शादाब बांगीचा मोबाईल हातात घेऊन पाहिला. यावरून वाद झाला आणि आरोपींनी फुटलेल्या बाटलीने त्याच्यावर वार केले.
Ans: दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली असून, संबंधित पोलीस ठाण्यांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.