आरटीआय कार्यकर्त्याच्या तक्रारीवरुन कल्याण पूर्वेतील उर्दू शाळेच्या बांधकामावर कारवाई केली. शाळेच्या शौचालयावर कारवाई केल्याचा आरोप माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी केला होता. या प्रकरणात आरटीआय कार्यकर्त्याची ऑडिओ क्लीपही समोर आली होती. या प्रकरणात महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. या शाळेत शौचालय बांधले जात आहे असा खुलासा महापालिका उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी केला आहे.
कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या गफूर डोन उर्दू माध्यमाच्या शाळेत शौचालयाची दुरावस्था असल्याने नव्याने शौचालय बांधण्याचे काम माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी एका खाजगी व्यक्तीला दिले होते. शाैचालय बांधण्याचे काम सुरु झाले. हे शौचालय नसून गाळा बांधला जात असल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली. तक्रार मागे घेण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप माजी नगरसेवक आणि खासजी कंत्राटदाराकडून केला गेला. या शौचालयावर महापालिकेवर कारवाई करुन जमीन दोस्त केले होते. यानंतर स्थानिक नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती.
या प्रकरणात उपायुक्त जाधव यांनी खुलासा केला आहे की, शाळा परिसरात जे बांधकाम सुरु होते. हे बांधकाम वाणिज्य वापरासाठी केले जात असल्याची तक्रार आम्हाला प्राप्त होती. म्हणून कारवाई केली. मात्र आता शाळेत शाैचालय बांधण्याचे सुरु केले आहे. हे काम तीन दिवसात पूर्ण होईल असे स्पष्ट केले आहे. मात्र महापालिका प्रशासनाने प्राप्त तक्रारीची शहानिशा का केली नाही. आत्ता शौचालय बांधले जात आहे. हे काम ते आधी करु शकले असते. कारण ही शाळा महापालिकेची आहे.






