Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: विदर्भात मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Marathi Breaking Live Marathi : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींसह राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन यांसारख्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 04, 2025 | 07:24 PM
Top Marathi News Today Live : विदर्भात मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Top Marathi News Today Live : विदर्भात मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Updates : राज्यातील काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होत आहे. असे असताना नागपुरात सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. बुधवारी शहराच्या काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. मात्र, आता नागपुरातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने 8 सप्टेंबरपर्यंत शहराचे हवामान असेच राहील असे संकेत दिले आहेत. 3 ते 5 सप्टेंबरपर्यंत हवामान सामान्यतः ढगाळ राहील. हलका पाऊस किंवा सरी पडण्याची शक्यता आहे. तर 6 ते 8 सप्टेंबरपर्यंत दररोज 1-2 हलक्या सरींची शक्यता आहे. या काळात शहराचे कमाल तापमान 30-31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23-24 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले.

The liveblog has ended.
  • 04 Sep 2025 07:21 PM (IST)

    04 Sep 2025 07:21 PM (IST)

    क्रिकेटप्रेमींच्या खिशाला बसणार फटका, IPL चे तिकीट ‘इतक्या’ रुपयांनी महागणार

    IPL Ticket Price Marathi News: देशभरातील क्रिकेटप्रेमींना जीएसटी सुधारणांमुळे धक्का बसला आहे. दोन कर स्लॅब असलेल्या नवीन जीएसटी प्रणालीनंतर, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) तिकिटांच्या किमती वाढणार आहेत. सरकारने या सामन्यांच्या प्रवेशावरील जीएसटी २८ टक्क्यांवरून ४० टक्के केला असल्याने पुढील हंगामात चाहत्यांना आयपीएल तिकिटांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील.

  • 04 Sep 2025 06:58 PM (IST)

    04 Sep 2025 06:58 PM (IST)

    Yamuna Flood: यमुनेला महापूर! दिल्ली बुडण्याच्या मार्गावर? ‘हे’ मार्ग पाण्याखाली; अनेक मेट्रो स्टेशन्स तर…

    Delhi/Yamuna River Flood: देशभरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. पंजाब, दिल्ली या राज्यांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. राजधानी दिल्लीत तर पुरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश पाठोपाठ हरियाणा राज्यात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. यमुना नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे दिललीवर पुराचे संकट उभे राहिले आहे.

  • 04 Sep 2025 06:31 PM (IST)

    04 Sep 2025 06:31 PM (IST)

    ठाणे महानगरपालिकेच्या भरतीत मुदतवाढ! अर्ज कर्त्यांनो, वाढ्त्या मुदतीचा घ्या फायदा

    ठाणे महापालिकेची नवीन भरती सुरू झाली आहे, ज्यात एकूण १७७३ पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती आस्थापकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय आणि निमवैद्यकीय सेवांमध्ये आहे. उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, विविध विभागांमध्ये नोकरीसाठी संधी उपलब्ध आहे.

  • 04 Sep 2025 05:57 PM (IST)

    04 Sep 2025 05:57 PM (IST)

    ऑक्टोबर महिन्यात पोलीस भरती सुरु!

    ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात पोलीस शिपाई भरती सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील गृह विभागात १५,००० शिपायांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२४–२५ या भरतीला अधिकृत मान्यता मिळाली असून, विशेषतः २०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे भरतीच्या प्रक्रियेत अनेक इच्छुक उमेदवार सहभागी होऊ शकतील, ज्यामुळे राज्यातील पोलीस फौज मजबूत होण्यास मदत होईल.

    वाचा सविस्तर 

  • 04 Sep 2025 05:45 PM (IST)

    04 Sep 2025 05:45 PM (IST)

    Ola इलेक्ट्रिकची बाजारात जोरदार ‘मुसंडी’!

    तुम्ही जर इलेक्ट्रिक दुचाकी बाजाराचे ताजे आकडे पाहिले, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण, ऑगस्ट 2025 मध्ये, ओला इलेक्ट्रिकने पुन्हा एकदा बाजारात जोरदार मुसंडी मारली आहे. गेल्या महिन्यात ओलाने बजाज ऑटोला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले. दुसरीकडे, बजाज ऑटोसाठी ऑगस्ट महिना फारसा चांगला नव्हता. त्यांची विक्री कमी झाल्यामुळे ते एथर एनर्जी आणि हिरो विडा यांच्याही मागे जाऊन पाचव्या स्थानावर पोहोचले. चला, ऑगस्ट महिन्याच्या या रंजक आकड्यांबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

    वाचा सविस्तर 

  • 04 Sep 2025 05:39 PM (IST)

    04 Sep 2025 05:39 PM (IST)

    मराठा आरक्षणाचा निर्णय होताच ओबीसी समाज आक्रमक; ‘या’ तारखेला बारामतीत एल्गार मेळावा

    बारामती : मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे ओबीसीचे आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी समाजाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी बारामतीत एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी हा मेळावा होणार असून, पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी बांधव या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, ॲड मंगेश ससाणे, मृणाल ढोले हेही उपस्थित राहणार असून, या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 04 Sep 2025 05:30 PM (IST)

    04 Sep 2025 05:30 PM (IST)

    टायगर श्रॉफच्या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाची कात्री

    बॉलीवूडच्या सुपरहिट फ्रँचायझी मधील ‘बागी’ चित्रपट देखील एक आहे. या चित्रपटाचा आता नुकताच चौथा भाग प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. टायगर श्रॉफ आणि संजय दत्त यांचा ‘बागी ४’ हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. परंतु त्याच्या प्रदर्शनापूर्वीच सेन्सॉर बोर्डाने अनेक सीन कट केले आहेत. आणि सेन्सॉर बोर्डाने कोणते दृश्य कट केले आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

    वाचा सविस्तर

  • 04 Sep 2025 05:10 PM (IST)

    04 Sep 2025 05:10 PM (IST)

    ‘तुझा अहंकार तुझ्याकडेच ठेव…’, आई-मुलीच्या नात्यात दुरावा

    ‘बिग बॉस १९’ या रिॲलिटी शोमध्ये घरातील वातावरण आता लवकरच बदलणार आहे. शोमध्ये मजबूत नातेसंबंध निर्माण करणारे स्पर्धक आता हादरणार आहेत. कुनिका सदानंद आणि तान्या मित्तल यांच्यात एक मजबूत बंधन पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाले आहे. त्या दोघीही घरात आई आणि मुलीसारखे राहत आहेत. पहिल्या आठवड्यापासून तान्या कुनिकासाठी सर्वांशी भांडताना दिसत आहे. संपूर्ण घराच्या विरोधात जाऊन तान्याने कुनिकाला ‘बिग बॉस १९’ ची पहिली कॅप्टन बनवले. यानंतर दोघेही नेहमीच एकमेकांसोबत दिसले. मात्र, आता शोमध्ये दोघींच्याही नात्यात दुरावा निर्माण होताना दिसत आहे.

    वाचा सविस्तर

  • 04 Sep 2025 05:08 PM (IST)

    04 Sep 2025 05:08 PM (IST)

    जीएसटी सुधारणांमुळे बाजार तेजीत पण वाढीची गती झाली कमी

    आशियाई बाजारातील सकारात्मक कल आणि जीएसटी सुधारणांच्या घोषणेमुळे गुरुवारी (४ सप्टेंबर) भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. तथापि, आयटी आणि पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये विक्रीमुळे शेवटी बाजारातील हालचाली मंदावल्या. तर महिंद्रा अँड महिंद्राच्या नेतृत्वाखालील ऑटो शेअर्समधील वाढीने बाजार वाढीसह बंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जीएसटी कौन्सिलने दोन स्लॅबसह नवीन रचनेला मंजुरी दिली आहे. याचा बाजारातील भावनांवर सकारात्मक परिणाम झाला. या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम ऑटो आणि एफएमसीजी स्टॉकमध्ये (FMCG Stocks) दिसून आला. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स ८१,४५६.६७ अंकांवर जोरदार उडी मारून उघडला. व्यवहारादरम्यान तो ७०० अंकांनी वाढला. तथापि, शेवटी तो १५०.३० अंकांनी किंवा ०.१९ टक्क्यांनी वाढीसह ८०,७१८.०१ वर बंद झाला.

    वाचा सविस्तर 

  • 04 Sep 2025 04:55 PM (IST)

    04 Sep 2025 04:55 PM (IST)

    कुडाळमध्ये राणे कुटुंबाने गणेशोत्सवात साकारला “रावण-जटायू” युद्ध चलचित्र देखावा

    गणपती सण शेवटच्या टप्प्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी देखावे साकारण्यात आले आहेत. कुडाळच्या सांगिरडेवाडी येथील राणे कुटुंबाने रामायणातील रावण आणि जटाऊ युद्ध चलचित्र देखावा साकारला आहे. राणे कुटुंबियांच्या घरी विराजमान झालेला गणराय हा सुद्धा पर्यावरणपूरक आहे.

  • 04 Sep 2025 04:40 PM (IST)

    04 Sep 2025 04:40 PM (IST)

    कल्याण मध्ये ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण

    सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत नवीन जीआर काढला आहे मात्र ओबीसी समाजाकडून या जीआरला प्रचंड विरोध होत आहे मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देऊ नये तसंच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीसाठी राज्यभरात ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे कल्याण मध्ये देखील ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आलाय उपोषणकर्त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली.

  • 04 Sep 2025 04:40 PM (IST)

    04 Sep 2025 04:40 PM (IST)

    भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईला राणे समर्थकांकडून केराची टोपली !

    सत्ता आहे म्हणून राणे भाजपसोबत आहेत. त्यांना स्वतःच्या स्वार्थापलीकडे कोणतीही विचारधारा नाही. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईला राणे समर्थकांनी केराची टोपली दाखवली आहे. सिंधुदुर्गातील भाजप ही फक्त राणेंमुळे आहे. हे राणे समर्थक व त्याच्या नेत्यांनी प्रभाकर सावंत यांच्या नाकावर टिच्चून दाखवून दिले आहे. येणाऱ्या काळात राणेंना वगळून सिंधुदुर्गातील भाजप ही शून्य आहे हे त्यांनी दाखवून दिल आहे याची जाणीव भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी ठेवावी एवढीच त्यांना विनंती आहे, असा उपरोधिक टोला वैभव नाईक यांनी प्रभाकर सावंत यांनी केलेल्या कुडाळ नगरपंचायतमधील नगरसेवक निलंबनाच्या कारवाईवरून लगावला आहे.

  • 04 Sep 2025 04:40 PM (IST)

    04 Sep 2025 04:40 PM (IST)

    Jarange Patil On Fadnavis: ‘फडणवीसांना ‘वर्षा’वर धुवून…’; जरांगे पाटलांनी सोडली पातळी, नव्या वादाला फुटणार तोंड

    Manoj Jarange Patil Controvesrial Statement: महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर काढला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान पाच दिवसांनी जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. यावेळी संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे.

  • 04 Sep 2025 04:35 PM (IST)

    04 Sep 2025 04:35 PM (IST)

    केडीएमसीविराेधात बसपाचे धरणे आंदोलन

    कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील दलित वस्त्यांमधील मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने बसपाने बुधवारपासून पालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनात बसपाचे ठाणे जिल्हा प्रभारी सुदाम गंगावणे, मधुकर बनसोड, बाळू भोसले, प्रदीप सोनावणे, दीपक खंदारे, आल्मेश मिठबावकर, विजय सोनावणे आदींनी सहभाग घेतला आहे. पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. या धरणे आंदाेलनाची दखल घेतली नसल्याने हे आंदोलन दररोज सकाळी १० ते ६ दरम्यान केले जाणार आहे.

  • 04 Sep 2025 04:30 PM (IST)

    04 Sep 2025 04:30 PM (IST)

    नगरमध्ये अवतरले उज्जैनचे महाकाल, नगरकरही घेतायेत मनोभावे

    गणेशोत्सवानिमित्त अहिल्यानगर शहरात अनेक वर्षांपासून धार्मिक, सामाजिक, कला, क्रीडा यांसह विविध विषयांवर उत्कृष्ट असे हलते देखावे सादर केले जातात. याचबरोबर सामाजिक विषयांच्या जागृतीकरिता जिवंत देखावा देखील अनेक मंडळाकडून सादर केला जातो. शहरातील नवयुग मित्र मंडळाकडून यावर्षी उज्जैन येथील श्री महाकाल मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारली आहे. सुमारे ६५ फूट उंच असलेल्या या प्रतिकृती पाहण्यासाठी नगरकरांसह नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळते. ज्यांना उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात महाकालचे दर्शन घेणे शक्य नाही ते नागरिक नगरमध्ये महाकालच्या प्रतिकृतीचे साक्षात दर्शन घेऊन समाधान व्यक्त करत आहेत.

  • 04 Sep 2025 04:25 PM (IST)

    04 Sep 2025 04:25 PM (IST)

    कल्याण मध्ये ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण

    सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत नवीन जीआर काढला आहे मात्र ओबीसी समाजाकडून या जीआरला प्रचंड विरोध होत आहे मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देऊ नये तसंच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीसाठी राज्यभरात ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे कल्याण मध्ये देखील ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आलाय उपोषणकर्त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली.

  • 04 Sep 2025 04:20 PM (IST)

    04 Sep 2025 04:20 PM (IST)

    केडीएमसी २७ गाव संघर्ष समितीचा प्रभाग रचनेला विरोध,

    निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  केडीएमसी २७ गाव संघर्ष समितीचा प्रभाग रचनेला विरोध केला आहे. आम्हाला केडीएमसीत रहायचे नाही असा संघर्ष समितिने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हजारोच्या संखेंने प्रभाग रचनेला समितीच्या सदस्यांनी हरकती घेतल्या आहे.

  • 04 Sep 2025 04:15 PM (IST)

    04 Sep 2025 04:15 PM (IST)

    शिवगर्जनाच्या "ऑपरेशन सिंदूर" ला नगरकरांची दाद, कर्तुत्ववान महिलांच्या हस्ते गणेशाची आरती

    गणेशोत्सवानिमित अहिल्यानगर शहरात विविध मंडळांनी देखावे तयार करण्यात आले आहे. या देखाव्यांना नगरकरांनी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे यावर्षी देशातील सर्वात मोठे ऑपरेशन सिंदूर यावर जिवंत देखावा सादर केला आहे. या देखाव्याला देखील नगरकरांनी विशेष पसंती दिली असून ऑपरेशन सिंदूरचा थरार अंगावर काटा आणणारा असल्याचे भावना नगरकरांनी बोलून दाखवली. यावेळी हे सादरीकरण पाहिल्यानंतर पुन्हा एकदा देशाभिमान जागृत झाल्याशिवाय राहत नाही असे देखील प्रेक्षकांनी सांगितले आहे.

  • 04 Sep 2025 04:09 PM (IST)

    04 Sep 2025 04:09 PM (IST)

    डोंबिवलीतील रेतीबंदर रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कोणताही निधी न वापरता मोठागाव ते रेतीबंदर रोड वरती अस्फाल्ट मास्टिकने खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी रस्त्यावरील खड्डे भरण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाला आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाची दखल घेत रस्त्यावरील खड्डे अस्फाल्ट मास्टीक पद्धतीने भरण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.

  • 04 Sep 2025 03:54 PM (IST)

    04 Sep 2025 03:54 PM (IST)

    भिवंडीच्या खाडीत महिलेचे सापडले शीर, पोलिसांनी ४८ तासात आरोपीला केली अटक

    भिवंडीच्या ईदगाह झोपड्पट्टीजवळील खाडीत एका महिलेचे शीर सापडले होते. या घटनेचा उलगडा भोईवाडा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी २४ तासात मृत महिलेची ओळख पटवून ४८ तासात आरोपीला अटक केली आहे.

  • 04 Sep 2025 03:43 PM (IST)

    04 Sep 2025 03:43 PM (IST)

    Duleep Trophy 2025 मध्ये ऋतुराज गायकवाडचा शतकी तडाखा!

    बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धा असणाऱ्या दुलीप ट्रॉफीचा थरार सध्या सुरू आहे. दुलीप ट्रॉफीचा उपांत्य सामना पश्चिम विभाग आणि मध्य विभाग यांच्यात खेळवला जात आहे.

  • 04 Sep 2025 03:31 PM (IST)

    04 Sep 2025 03:31 PM (IST)

    ‘या’ राज्यांमधील महापुरावर कोर्टाने काढली थेट नोटीस

    देशभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यांमध्ये अति ते अति मुसळधार पाऊस सुरु आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाब व राजधानी दिल्लीला महापुराचा फटका बसला आहे. दरम्यान निर्माण झालेल्या पुरस्थितीवर सुप्रीम कोर्टाने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे.

  • 04 Sep 2025 02:45 PM (IST)

    04 Sep 2025 02:45 PM (IST)

    Asia cup मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार महामुकाबला!

    ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ च्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यूएईमध्ये आयोजित करण्यात आलेला हा आशिया कप यावेळी टी २० स्वरूपात खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी दोन आठवड्यापूर्वी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरणार आहे. १० सप्टेंबरल यूएई विरुद्ध सामना खेळून भारत या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर १४ सप्टेंबररोजी पाकिस्तानविरुद्ध भारताचा दूसरा सामना असणार आहे. हा सामना चांगलाच रोमांचक होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.  अशातच भारत-पाकिस्तान सामन्यात यावेळी १३ वर्षाचा विक्रम मोडला जणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. याबद्दल आयपण जाणून घेऊया.

  • 04 Sep 2025 02:35 PM (IST)

    04 Sep 2025 02:35 PM (IST)

    अक्षय कुमारसोबत आलिया भट्टने ‘लोका’चे केले कौतुक

    अलिकडेच प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट ‘लोका: चॅप्टर १’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही या चित्रपटाचे कौतुक होत आहे. इतकेच नाही तर आता हळूहळू सेलिब्रिटी देखील या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. याच क्रमात आता अभिनेत्री आलिया भट्टनेही ‘लोका’चे कौतुक केले आहे. तसेच अक्षय कुमारने देखील चित्रपटाबद्दल एक नोट शेअर केली आहे.

  • 04 Sep 2025 02:30 PM (IST)

    04 Sep 2025 02:30 PM (IST)

    फक्त दहा रुपयांसाठी नातवाने केला आजीचा खून

    महागाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आठवडाभरापूर्वी माळकिन्ही येथे मनोरुग्ण लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला होता. त्यानंतर आता मनोरुग्ण नातवाने फक्त 10 रुपयांसाठी आजीचा निर्घृण खून केला. ही घटना तालुक्यातील सुधाकरनगर (पेढी) येथे बुधवारी सकाळी घडली.

  • 04 Sep 2025 02:25 PM (IST)

    04 Sep 2025 02:25 PM (IST)

    इचलकरंजीमध्ये जेवणात आढळल्या अळ्या

    इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी पर्यावरणपूरक जलकुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी सकाळपासून उशिरापर्यंत अनेक कर्मचारी जबाबदारीने कार्यरत होते. मात्र आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांशी अत्यंत हलगर्जीपणाचा प्रकार घडला आहे. महानगरपालिकेकडून कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात दिलेले जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर भोजनामध्ये अळीही सापडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप उसळला आहे.

  • 04 Sep 2025 02:20 PM (IST)

    04 Sep 2025 02:20 PM (IST)

    जीएसटी सुधारणांमुळे ‘या’ शेअर्समध्ये वाढ

    GST Reforms Impact on Auto Sector Marathi News: जीएसटी कौन्सिलने जीएसटी कर स्लॅबमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले. कौन्सिलने कर रचना सोपी करण्याचा आणि आता फक्त दोन दर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.

  • 04 Sep 2025 02:17 PM (IST)

    04 Sep 2025 02:17 PM (IST)

    Heavy Rain Alert: देशभरात पावसाचा कहर; उत्तराखंड नव्हे तर 'या' राज्यांमध्ये घालणार धुमाकूळ, IMD चा अलर्ट काय?

    IMD Indian Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पंजाब, राजधानी दिल्लीत महापुराचा फटका बसला आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्राच्या देखील काही जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने कोणत्या राज्यांना कोणता अलर्ट दिला आहे, त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • 04 Sep 2025 02:07 PM (IST)

    04 Sep 2025 02:07 PM (IST)

    Mahindra THAR ते Toyota Innova किती स्वस्त होणार कार्स

    २२ सप्टेंबरपासून भारतात नवीन GST दर लागू होतील. त्यानंतर सर्व वस्तूंच्या किमती बदलतील. यामध्ये कार आणि एसयूव्हीचाही समावेश आहे. सरकार कोणत्या प्रकारच्या कारवर कोणत्या जीएसटी दराने कर आकारेल. नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर, महिंद्रा ते टोयोटा पर्यंतच्या एसयूव्ही आणि एमपीव्हीवर किती बचत होईल (कारांवर जीएसटी कट). या लेखातून तुम्हाला आम्ही अधिक माहिती देत आहोत.

  • 04 Sep 2025 02:07 PM (IST)

    04 Sep 2025 02:07 PM (IST)

    ड्रोन विरुद्ध काउंटर-ड्रोन; हिमालयात धोका?

    Yudh Abhyas 2025 : भारत आणि अमेरिका यांच्यातील लष्करी सहकार्य हे आता केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष रणांगणावर दिसत आहे. १ सप्टेंबरपासून अलास्कामध्ये सुरू झालेला ‘युद्ध अभ्यास २०२५’ हा याचाच प्रत्यय देतो. १४ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या सरावात भारतीय सैनिक आणि अमेरिकन आर्मीचे “आर्क्टिक वुल्व्हज” एकत्र येऊन बर्फाळ डोंगराळ प्रदेशात युद्धकौशल्याचा सराव करत आहेत.

  • 04 Sep 2025 02:06 PM (IST)

    04 Sep 2025 02:06 PM (IST)

    पुन्हा एकदा भूकंपाने हादरला अफगाणिस्तान

    अफगाणिस्तान नुकत्याच झालेल्या भूकंपाच्या झटक्यातून सावरत असताना पुन्हा एक झटका बसला आहे. पुन्हा एकदा भूकंपाच्या झटक्यांना अफगाणिस्तान हादरला आहे. गुरुवारी (४ सप्टेंबर) अफगाणिस्तानमध्ये ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूंकपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूंकपाची खोली १३५ किलोमीटर खोल होती. सध्या या दुसऱ्या भूकंपामुळे कोणती जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

  • 04 Sep 2025 01:55 PM (IST)

    04 Sep 2025 01:55 PM (IST)

    राघव चड्ढा यांच्यानंतर आणखी एका आपच्या खासदाराचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

    देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यात दिल्ली, हिमाचल प्रदेशसह पंजाबमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला आहे. अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना आता आम आदमी पक्षाचे पंजाबमधील राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पूरग्रस्त राज्यासाठी आपल्या स्थानिक क्षेत्र विकास (एलएडी) निधीतून 3.25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यांच्यानंतर आता खासदार स्वाती मालीवाल यांनीही मदत जाहीर केली.

  • 04 Sep 2025 01:45 PM (IST)

    04 Sep 2025 01:45 PM (IST)

    मुस्लिम देशांचा नेता बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुर्कीमध्ये लोक का सोडत आहेत इस्लाम?

    जगभरात इस्लाम धर्म मानणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे चित्र रंगवले जाते. परंतु, एक ताज्या सर्वेक्षणातून असे स्पष्ट झाले आहे की काही मुस्लिमबहुल देशांमध्ये इस्लाम सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, मुस्लिम जगाचे नेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुर्कीमध्येच सर्वाधिक लोक इस्लामपासून दुरावत आहेत. प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या या विस्तृत सर्वेक्षणात ३६ देशांचा समावेश करण्यात आला. यातून १३ देशांमध्ये इस्लाम स्वीकारणारे आणि सोडणारे लोक दोन्ही प्रकारे आढळले. या यादीत तुर्कीसह भारत, अमेरिका, सिंगापूरसारखे देशही आहेत.

  • 04 Sep 2025 01:35 PM (IST)

    04 Sep 2025 01:35 PM (IST)

    Netflix चा नियम आता YouTube देखील करणार लागू

    नेटफ्लिक्सप्रमाणेच, व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube देखील पासवर्ड शेअरिंगवर कठोर भूमिका घेण्याची तयारी करत आहे. अलिकडच्या अहवालांवरून असे दिसून आले आहे की कंपनी अशा वापरकर्त्यांवर कारवाई करत आहे जे एकाच घरात नाहीत आणि YouTube प्रीमियम फॅमिली प्लॅनचा गैरवापर रोखण्यासाठी त्यांचा पासवर्ड तुमच्या मित्रांसोबत शेअर करून YouTube प्रीमियमचा आनंद घेत आहेत.पाहिले तर, हे पाऊल अगदी Netflix ने अलीकडेच पासवर्ड शेअरिंग थांबवण्यासाठी उचललेल्या पावलासारखे आहे. त्यामुळे आता सबस्क्राईबर्स आणि युजर्सवर थेट परिणाम होणार आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

  • 04 Sep 2025 01:25 PM (IST)

    04 Sep 2025 01:25 PM (IST)

    अंतर्गत खेळी की पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान?

    उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन नेहमीच त्यांच्या गूढ आणि गूढतेने भरलेल्या निर्णयांसाठी ओळखले जातात. जगभरातील नेत्यांना चकित करणाऱ्या त्यांच्या हालचालींमध्ये अलीकडेच एक नवीन वळण दिसत आहे ते म्हणजे त्यांच्या मुलगी किम जो आह हिला उत्तराधिकारी म्हणून पुढे आणणे. हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे कारण किमचा एक मोठा मुलगाही अस्तित्वात आहे, तरीसुद्धा त्याला न बाजूला ठेवून मुलीला समोर आणले जात आहे.

  • 04 Sep 2025 01:15 PM (IST)

    04 Sep 2025 01:15 PM (IST)

    आर अश्विननंतर भारताच्या या फिरकीपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृती!

    मागिल काही महिन्यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी क्रिकेटच्या अनेक फाॅरमॅटमधून सोशल मिडियावरच निवृतीची घोषणा केली होती. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा, आर अश्विन यासांरख्या दिग्गज खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. भारताचा दिग्गज खेळाडू आर अश्विनने आयपीएलमधून देखील निवृती घेतली आहे. आर अश्विननंतर, आणखी एका भारतीय फिरकी गोलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे.

  • 04 Sep 2025 01:06 PM (IST)

    04 Sep 2025 01:06 PM (IST)

    आता कामगारांना 9 तासांऐवजी 12 तास काम करावे लागणार

    राज्य सरकार कामाचे तास वाढवण्याचा विचार करत असल्याची माहिती आधीच समोर आली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात कामगार विभागाला याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. अखेर, यावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून महाराष्ट्र दिवसाचे कामाचे तास ९ वरून १२ तास करण्यात आला आहे.केंद्र सरकारच्या ease of doing business धोरणांतर्गत देशात होणारे बदल लक्षात घेता कायद्यातील उद्योग आणि कामगारांसाठी या दोन्ही घटकांसाठी महत्त्वाचे असून उदयोग क्षेत्राला आहे आणि औद्योगिक क्षेत्राला अधिक लवचिकता आणि कामगारांसाठी पारदर्शक आणि नियोजित कामकाजासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

  • 04 Sep 2025 12:55 PM (IST)

    04 Sep 2025 12:55 PM (IST)

    ओबीसीच्या १२ मागण्या पूर्ण - सावे

    ओबीसीच्या १२ मागण्या पूर्ण झाल्या आहेत अशी माहिती माध्यमांना सावे यांनी सांगतली आहे.

  • 04 Sep 2025 12:45 PM (IST)

    04 Sep 2025 12:45 PM (IST)

    मंत्री अतुल सावे ओबीसींच्या उपोषणस्थळी

    मंत्री अतुल सावे ओबीसींच्या उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही अडचण येणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलंय. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींना धक्का लागणार नाही, असं ते म्हणाले.

  • 04 Sep 2025 12:35 PM (IST)

    04 Sep 2025 12:35 PM (IST)

    ओबीसी आणि मराठ्यांना न्याय देण्याचं काम फडणवीसांनी केलं- सावे

    “ओबीसींच्या बारा मागण्या पूर्ण करण्यात येणार. महाज्योतीच्या माध्यमातून अभ्यासिका सुरू करणार. ओबीसी आणि मराठ्यांना न्याय देण्याचं काम फडणवीसांनी केलं. सरकार ओबीसींच्या पूर्णपणे पाठिशी असून विनंतीला मान देऊन उपोषण सोडा,” असं आवाहन अतुल सावेंनी केलं.

  • 04 Sep 2025 12:25 PM (IST)

    04 Sep 2025 12:25 PM (IST)

    जी.आर बनविण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

    कुणी कितीही समित्या बनविल्या तरी आरक्षण मिळणार, असा ठाम विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. जी.आर बनविण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे जरांगे म्हणाले.

  • 04 Sep 2025 12:15 PM (IST)

    04 Sep 2025 12:15 PM (IST)

    ओबीसी-मराठा आरक्षण मुद्या पेटला

    मराठा आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु असताना ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी त्याला विरोध केला आहे. त्यांनी मंत्रिमंडळाचा बैठकीला हजर न राहता अप्रत्यक्षपणे या निर्णयाचा निषेध केला आहै. सध्या राज्यात ओबीसी-मराठा आरक्षण मुद्या पेटला आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

  • 04 Sep 2025 12:10 PM (IST)

    04 Sep 2025 12:10 PM (IST)

    'नेता शब्द पाळणारा' फडणवीस

    भाजपकडून नांदेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणाचे श्रेय देणारा यावर मजकूर लिहिलेला आहे.'नेता शब्द पाळणारा' असा फडणवीसांचा उल्लेख करण्यात आला आहे. फडणवीसांसोबत मनोज जरांगेंचाही फोटो लावला आहे.

  • 04 Sep 2025 12:02 PM (IST)

    04 Sep 2025 12:02 PM (IST)

    कोकण किनारपट्टीसह पुणे, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

    गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागत आहे. पुढील दोन-तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणाऱ्या असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार आज मुंबई पुण्यासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा- विदर्भात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत

  • 04 Sep 2025 11:55 AM (IST)

    04 Sep 2025 11:55 AM (IST)

    ओबीसीच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा - राऊत

    राज्य सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सहा मागण्या मान्य केल्यामुळे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर आता ओबीसीच्या मुद्द्यावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केला आहे.

  • 04 Sep 2025 11:50 AM (IST)

    04 Sep 2025 11:50 AM (IST)

    नागपूरमधील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये भीषण आग

    नागपूर जिल्‌ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत काल मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात १ कामगाराचा मृत्यू झाला असून १७ कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या भीषण घटनेबाबत आपण जाणून घेऊ या. स्फोटातील सर्व जखमींना नागपूरच्या विविध खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले

  • 04 Sep 2025 11:40 AM (IST)

    04 Sep 2025 11:40 AM (IST)

    नारायण राणेंच्या तब्येतीसाठी रोहित पवारांची पोस्ट

    खासदार नारायण राणे यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. याबाबत रोहित पवारांनी पोस्ट करत लिहिले आहे की, ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेब यांना जसलोक रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजली. राणे साहेब तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा, माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

  • 04 Sep 2025 11:32 AM (IST)

    04 Sep 2025 11:32 AM (IST)

    आमदार मिलिंद नार्वेकर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला

    राज्यामध्ये गणेशोत्सावाचा मोठा उत्साह असून राजकीय नेते देखील यामध्ये सहभागी होत आहेत.  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पत्नीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली.

  • 04 Sep 2025 11:19 AM (IST)

    04 Sep 2025 11:19 AM (IST)

    आरक्षणाच्या गदारोळामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेमध्ये वाढ

    मराठा आरक्षणाबाबत जीआर काढल्यामुळे ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला जाणे देखील टाळले. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्या सहा मागण्या मान्य केल्यामुळे नाराजी उघड केली होती. यानंतर आता त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

  • 04 Sep 2025 11:11 AM (IST)

    04 Sep 2025 11:11 AM (IST)

    महानुभाव पंथाची स्थापना करणाऱ्या चक्रधर स्वामींची जयंती

    श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला आणि त्यांनी भक्ती आणि द्वैत तत्त्वज्ञानावर आधारित कृष्णधर्माची स्थापना केली. मराठी भाषेला देववाणीचा दर्जा देऊन, सर्वसामान्य लोकांमध्ये धर्मप्रसार केला आणि त्यांना मोक्षमार्ग खुला करून दिला. त्यांनी लिहिलेले लीळाचरित्र हे आजही पुजनीय मानले जात असून त्यातील कथा या अत्यंत लोकप्रिय आहेत.

Web Title: Top marathi news today live breaking news political news international news sports update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 08:55 AM

Topics:  

  • live updates
  • Marathi Breaking news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी
1

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ
2

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Dombivli Potholes: डोंबिवलीतील नागरिकांच्या पाठपुराव्याला यश; मोठागाव-रेतीबंदर रोडची दुरुस्ती सुरू
3

Dombivli Potholes: डोंबिवलीतील नागरिकांच्या पाठपुराव्याला यश; मोठागाव-रेतीबंदर रोडची दुरुस्ती सुरू

नवीन कमर्शियल ट्रक म्हणून Tata LPT 812 लाँच, पाच टन पेलोडसह मिळेल पॉवरफुल इंजिन
4

नवीन कमर्शियल ट्रक म्हणून Tata LPT 812 लाँच, पाच टन पेलोडसह मिळेल पॉवरफुल इंजिन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.