Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी आमदारांचा संताप! मोखाड्यातील हुतात्मा स्मारकासमोर व्यापारी गाळे

मोखाडा शहरातील हुतात्मा स्मारकासमोर व्यापारी गाळ्यांचे बांधकाम सुरू झाल्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. माजी आमदार सुनील भुसारा यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवत हे बांधकाम त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 08, 2025 | 05:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा शहरातील एकमेव पवित्र हुतात्मा स्मारक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. 1984 साली स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधले गेलेले हे स्मारक अनेक वर्षांपासून 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे रोजी झेंडावंदनासह साजरे होते. काही वर्षांपूर्वी स्मारकाचे सुशोभीकरण व दुरुस्तीही करण्यात आली होती. मात्र आता या स्मारकाच्या समोरच पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने व्यापारी गाळ्यांचे बांधकाम सुरू केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

Suresh Dhas son Accident : आमदार सुरेश धस यांच्या अडचणींमध्ये वाढ; मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू!

माजी आमदार सुनील भुसारा यांनी या बांधकामाचा तीव्र निषेध करत जिल्हा परिषदेवर टीका केली आहे. “हुतात्मा स्मारक हे श्रद्धेचे स्थान आहे, त्याच्या समोर गाळे बांधून त्याचे पावित्र्य नष्ट केले जात आहे. गाळ्यांमुळे परिसरात घाण वाढेल, स्मारक झाकले जाईल आणि बलिदानाची विटंबना होईल,” असा आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले, “हे बांधकाम त्वरित थांबवून जमीनदोस्त करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.”

भुसारा यांनी स्पष्ट केले की, मूळत: स्मारकाच्या विकासासाठी आलेल्या निधीतूनच हे गाळे बांधले जात आहेत, जे पूर्णतः अनुचित आहे. “विकासाच्या नावाखाली स्मारकाचा श्वासच कोंडण्याचा प्रयत्न होत आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता यांच्याकडे तक्रारही दाखल केली आहे.

दरम्यान, जिप बांधकाम उपविभागाचे उप अभियंता अजय गायकवाड यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “विकासात्मक सुधारणा या विषयाखालीच निधी आला आहे. त्यातून हे गाळे बांधले जात आहेत.”

देवेंद्र फडणवीसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा; हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

मात्र या गाळ्यांमुळे स्मारकाचे महत्त्व व पवित्रता धोक्यात येणार असल्याने स्थानिक नागरिक, समाजसेवक आणि माजी आमदार संतप्त झाले आहेत. हुतात्म्यांच्या स्मृतीसाठी उभ्या राहिलेल्या या वास्तूची विटंबना न होता, स्मारकाभोवती बाग, हिरवळ, लहान मुलांची खेळणी आदींचे काम करणे अपेक्षित होते, असेही मत व्यक्त केले जात आहे. आता जिल्हा परिषद यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Traders gather in front of the hutatma chauk in mokhada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

नववर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर! पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्यात आले पुस्तकांचे वितरण
1

नववर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर! पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्यात आले पुस्तकांचे वितरण

Vasai : नायगावच्या सलूनमध्ये वाजलं ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ गाणं
2

Vasai : नायगावच्या सलूनमध्ये वाजलं ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ गाणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.