विरारच्या प्रसिद्ध जीवदानी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. देवीच्या दर्शनासाठी डोंगरावरील मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असून, परिसरात भक्ती आणि श्रद्धेचा उत्साह दिसून येत आहे. पालघर जिल्ह्यातील विरार येथील जीवदानी देवीचे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू असते. पायऱ्यांचा मार्ग किंवा रोपवेच्या सुविधेचा वापर करून भाविक मंदिरात पोहोचतात.