Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्शन मोडवर’; ‘नो पार्किंग’मध्ये वाहन लावल्यास आता थेट…

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्त्यावर ‘नो पार्किंग’मध्ये वाहन पार्क केल्यास आता चांगलेच महागात पडणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 07, 2024 | 02:04 PM
वाहतूक पोलीस 'अ‍ॅक्शन मोडवर'; ‘नो पार्किंग’मध्ये वाहन लावल्यास आता थेट...

वाहतूक पोलीस 'अ‍ॅक्शन मोडवर'; ‘नो पार्किंग’मध्ये वाहन लावल्यास आता थेट...

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्त्यावर ‘नो पार्किंग’मध्ये वाहन पार्क केल्यास आता चांगलेच महागात पडणार आहे. पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांकडून आता अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहतूक शाखेकडून आता २५ टोइंग व्हॅन या कारवाईसाठी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून आता अशा दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त बापू बांगर यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव हि औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे, ही आयटी पार्क क्षेत्रे असुन देहु व आळंदी हि संतांची भुमी असुन पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत मोठमोठ्या बाजारपेठा तसेच शैक्षणीक व व्यापारी संकुले असुन नामांकित अशी हॉस्पीटल्स आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातर्गत दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा वापर करणाऱ्या नागरीकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून नागरीक आपली दैनंदिन कामे करण्या करिता त्यांचे दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करत असतात. पिंपरी चिंचवड शहरात नागरीक ठिकठिकाणी आपले दुचाकी तसेच चारचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे तसेच बेकायदेशीरपणे दिसेल त्या ठिकाणी पार्क करत असल्याने वाहतुक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ‘टोईंग व्हॅन’द्वारे कारवाई सुरू करण्यात येत आहे. बेकायदेशीर व वाहतुकीस अडथळा होईल अशी पार्किंग करण्यात आलेली वाहने दंड आकारुन टोईंग करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर कारवाहीसाठी एकुण २५ वाहने वापरण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यामध्ये एकुण ०८ वाहने वापरण्यात येत असून, टप्याटप्याने व आवश्यकतेनुसार वाहनांची संख्या वाढवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : पोलिसांसाठी आनंदाची बातमी; आता वाढदिवसाला मिळणार…

दंड आकारण्यात येणार

दुचाकी वाहन टोईंग केल्यास सदर वाहनांस ५०० रु दंड व २०० रु टोईंग चार्ज आकारण्यात येणार असून, ३६ रुपये जीएसटी असा एकुण ७३६/- रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच चारचाकी वाहनांकरीता ५०० रुपये दंड व ४०० रुपये टोईंग चार्ज आकारण्यात येणार, असून ७२ रुपये जीएसटी असा एकुण ९७२/- रुपये एवढा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच टोईंग कारवाई केलेल्या वाहनांवर पुर्वीचे चलन प्रलंचित असेल तर प्रलंबित चलनापैकी किमान एक चलन हे टोईंग वेळच्या चलनासोबत भरणे बंधनकारक असणार आहे. तरी नागरीकांनी आपली वाहने बेकायदेशीरपणे व वाहतुकीस अडथळा होईल याप्रमाणे न लावता योग्यरितीने पार्क करावेत, असे आवाहन पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी केले आहे.

Web Title: Traffic police will take action if the vehicle is parked in no parking nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 02:04 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • No Parking

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.