Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मळणी यंत्रात अडकून वनपुरीच्या शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू, पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे घडली घटना

पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे ज्वारीच्या मळणी यंत्रात अडकून महिला शेतकरी मंगल कुंभारकर यांचा जागीच मृत्यू झाला. या थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 18, 2026 | 08:25 PM
मळणी यंत्रात अडकून वनपुरीच्या शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मळणी यंत्रात अडकून वनपुरीच्या शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मळणी यंत्रात अडकून वनपुरीच्या शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू
  • पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे घडली घटना
सासवड (वा.): मळणी यंत्रात ज्वारीची मळणी करत असताना शेतकरी महिलेचे डोके अडकून सदर महिलेचा करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील माळशिरस परिसरात घडली. ही घटना एवढी भयानक होती की पाहणाऱ्या लोकांचा अक्षरशः थरकाप उडाला. डोक्याला बाधलेले स्कार्फ मशिनच्या चक्रात अडकले. त्याबरोबर महिला मशीनमध्ये ओढली गेली. त्यांच्या सोबत काम करणाऱ्या घरातील व्यक्तींना काही कळायच्या आत मुंडके एका बाजूला आणि शरीर दुसऱ्या बाजूला फेकले गेले. आणि काही क्षणात त्यांचा मृत्यू झाला.

मंगल तुकाराम कुंभारकर (वय ५५. रा वनपुरी ता पुरंदर) असे या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून याबाबत दत्तात्रय रोहीदास यादव, (रा. माळशिरस ता पुरदर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगल तुकाराम कुंभारकर या त्यांचा मुलगा विकास तुकाराम कुंभारकर ही माय लेक माळशिरस मधील पाटीलवस्ती येथील शेतामध्ये ज्वारीची कणसे मळणी मशीन मध्ये टाकून ज्वारी करीत होते. तसेच मशीन मालक नामदेव भानुदास बनकर( रा, राजुरी. ता.पुरंदर) हेही मशीनजवळच उभे होते.

दरम्यान मशीनच्या खाली पडलेली कणसे गोळा करून मशीनमध्ये टाकत असताना मयत मंगल कुंभारकर यांच्या डोक्याला बांधलेले स्कार्फ तसेच अंगातील शर्ट आणि डोक्याचे केस मळणी टॅक्टरच्या मागच्या बाजूकडील शाप्ट व मळणी मशीनचे जॉइन्ट मध्ये अडकुन मशीन मध्ये ओढल्या गेल्या. त्यांचे डोके मशीन मध्ये अडकल्याचे दिसताच त्याच वेगाने मशीन बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र मशीन बंद करण्यापूर्वीच काही सेकंदात मंगल कुंभारकर यांचे मुंडके तुटून एका बाजूला तर शरीर मशिनच्या दुसऱ्या बाजूला वेगाने फेकले गेले.

Heatwave News: ‘या’ जिल्ह्यामध्ये ‘हीट वेव्ह’चा इशारा, उष्माघात टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट

त्यांच्या मुलासामोरच घटना घडली, त्यामुळे काही क्षण काय करावे हेही त्यांना समजेना. जन्मदात्या आईचा डोळ्यासमोरच झालेला करुण अंत पाहून सर्वच सुन्न झाले. त्याही अवस्थेत त्यांना तातडीने जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

जखमी आईला उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये सोडून रुग्णवाहिका चालक माळशिरस मध्ये

माळशिरस मध्ये वनपुरी येतील महिला शेतकरी मंगल तुकाराम कुंभारकर यांचा मळणी मशीन मध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली. मात्र त्याच दिवशी घटनेच्या काही वेळापूर्वी वनपुरीमध्ये देखील अशीच घटना घडली. मळणी यंत्राच्या मशीनमध्ये अडकून चंद्रभागा मारुती कुंभारकर या जखमी झाल्या. त्यांनी डोक्याला बांधलेला स्कार्फ मशीन मध्ये अडकला मात्र त्यांनी तो तातडीने सोडवला, त्यामध्ये त्यांच्या डोक्याचे केस उपटले गेले आणि बाजूला फेकल्या गेल्याने थोडक्यात बचावल्या. त्यांनतर त्यांना तातडीने सासवड येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच याच गावातील महिलेचा माळशिरस मध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

दरम्यान माळशिरस मध्ये रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध झाली नाही. त्यामुळे वनपुरी ग्राम पंचायतकडे असलेली रुग्णवाहिका बोलावून घेण्याबाबत विचार सुरु केला. या रुग्णवाहिकेवर जखमी महिला शेतकरी चंद्रभागा कुंभारकर यांचा मुलगा दत्तात्रय कुंभारकर चालक म्हणून सामाजिक दातृत्वातून अतिशय अल्प मानधनावर काम करीत आहे. त्यामुळे एकीकडे त्याच गावातील महिलेचा मृत्यू तर दुसरीकडे स्वतःच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु असताना अपघाताची माहिती मिळतच क्षणाचाही विचार न करता घटनेचे गांभीर्य ओळखून सामाजिक दृष्टीकोन समोर ठेवून चालक दत्तात्रय कुंभारकर हे रुग्ण वाहिका घेवून माळशिरस मध्ये दाखल झाले. आणि तेथून मंगल कुंभारकर यांचे मृत शरीर रुग्णवाहिकेत घेवून जेजुरी ग्रामीण रुगालयात पोहोचले. त्यानंतर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Mahavitaran News: महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका! थकबाकीदारांचा वीजपुरवठा आता घरात बसून होणार खंडित

Web Title: Tragic death of female farmer from vanpuri after getting entrapped in threshing machine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 08:25 PM

Topics:  

  • Accident
  • Purandar News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.