महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका! (Photo Credit- Ai)
महावितरणने राज्यभरात २० फेब्रुवारीपासून रिमोट डिस्कनेक्शन मोहीम राज्यभरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांनी थकबाकीची रक्कम निश्चित कालावधीत भरली नाही तर, संगणक प्रणालीद्वारे वीज जोडणी बंद केली जात आहे. सुरुवातीला काही परिमंडलांत हा प्रयोग केल्यानंतर २३ फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगर परिमंडलातही स्मार्ट मीटर बसवलेल्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा ऑटो डिस्कनेक्ट करण्यास महावितरणने सुरुवात केली आहे.
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात गेल्या काही दिवसांत ७ हजारांहून अधिक थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा स्मार्ट मीटरमधील स्वयंचलित प्रणालीद्वारे बंद करण्यात आला आहे. त्यापैकी दोन हजारांहून अधिक ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरून वीजपुरवठा जोडून घेतला आहे. ऑटो डिस्कनेक्शननंतरही वीजबिल न भरणारा ग्राहक खरोखरच अंधारात आहे का की अनधिकृतरीत्या वीज घेऊन वापरतोय, याची पडताळणीही महावितरणकडून करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! जायकवाडी फुल्ल असूनही शहर तहानलेले; पाहा काय आहे नेमके कारण?
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात सुमारे साडेदहा लाख अकृषी ग्राहकांपैकी जवळपास ४ लाख स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर बसविलेल्या घरगुती वीजग्राहकांना दिवसाच्या वीजवापरावर प्रतियुनिट ८० पैसे सवलत देण्यात येत असल्याचे महावितरणने म्हटले आहे. दरम्यान, स्मार्ट वीजमीटरबाबत जनमानसात सुरु असलेले गैरसमज दूर करण्यासाठी स्मार्ट महावितरणने मीटरसंदर्भात जनजागृती मोहीमही हाती घेतली आहे. स्मार्ट मीटरने होणाऱ्या फायद्यांची माहिती देण्यात येत आहे. ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
स्मार्ट मीटर प्रणालीमध्ये थकीत बिलाची नोद होताच संबंधित ग्राहकाला एसएमएसद्वारे सूचना दिली जाते. बिलाची अंतिम मुदत उलटल्यानंतरही रक्कम न भरल्यास प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित केला जातो. तशी यंत्रणा त्यात बसविण्यात आली आहे. यकबाकी भरल्यानंतर रिमोट पद्धतीने पुन्हा वीजपुरवठा सुरू केला जातो. या प्रणालीमुळे मनुष्यबळाचा वेळ व श्रम वाचणार असून, थकबाकी नियंत्रणात येण्यास मदत होणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.
उन्हाचा कडाका वाढला! विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय






