राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात दिली माहिती
Maharashtra Advocate General Resign News in Marathi : महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी अचानक राजीनामा दिला आहे. यासंदर्भात मंगळवारी (१६ सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. सराफ यांच्याकडे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये बाजू मांडण्याची आणि महाराष्ट्र सरकारला कायदेशीप सल्ला देण्याची मुख्य जबाबदारी सराफ यांच्यावर होती.
वैयक्तिक कारणांमुळे सराफ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला. दरम्यान, पुढील व्यवस्था होईपर्यंत फडणवीस यांनी त्यांना काम पाहण्याची विनंती केली होती. त्यानुसार, सराफ जानेवारी महिन्यापर्यंत कामावर राहतील. मराठा समाजाला हैदराबाद राजपत्र सुरू करण्याच्या निर्णयात सराफ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
बातमी अपडेट होत आहे…