Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur News: ई-चलन दंडाविरोधात लातूरमध्ये वाहतूकदारांचा चक्का जाम; चुकीचे ई-चलन रद्द करण्याची मागणी

सरकारच्या ई-चलन प्रणालीतील त्रुटी व वाढीव दंडाच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अॅक्शन कमिटीच्या आवाहनानुसार लातूर जिल्ह्यात वाहतूकदारांनी आक्रमक आंदोलन छेडले आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 06, 2026 | 12:22 PM
ट्रिपल सीट वाहनांवर RTO ची कडक कारवाई; 1241 जणांकडून साडेबारा लाखांचा दंड वसूल

ट्रिपल सीट वाहनांवर RTO ची कडक कारवाई; 1241 जणांकडून साडेबारा लाखांचा दंड वसूल

Follow Us
Close
Follow Us:
  • लातूरमध्ये वाहतूकदारांचा आरटीओत चक्काजाम
  • तांत्रिक त्रुटी, अवाच्या सव्वा दंडाचा निषेध
  • चुकीचे ई-चलन रद्द करण्याची मागणी
 

Latur News: सरकारच्या ई-चलन प्रणालीतील त्रुटी व वाढीव दंडाच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अॅक्शन कमिटीच्या आवाहनानुसार लातूर जिल्ह्यात वाहतूकदारांनी आक्रमक आंदोलन छेडले. वाहतूकदा प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) मुख्य प्रवेशद्वारावर शेकडो वाहने उभी करून चक्का जाम करण्यात आला. आंदोलकांनी थेट अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. दंडाची लूट थांबवा, अन्यथा खुर्चा खाली करा, अशा घोषणांनी आरटीओ परिसर दणाणून गेला. सकाळी १० वाजल्यापासूनच खासगी बस, टॅक्सी व मालवाहतूक वाहनांचे मालक मोठ्या संख्येने कार्यालयाबाहेर जमले. काही वेळातच मुख्य प्रवेशद्वारावर वाहनांची रांग लागली आणि ये-जा पूर्णपणे ठप्प झाली.

Latur ZP News: लातूर जिल्हा परिषदेत बनावट प्रमाणपत्रांचा घोटाळा; तीन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

आंदोलकांनी अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करत निषेध नोंदवला. काही तास चाललेल्या या आंदोलनामुळे आरटीओ कार्यालयातील कामकाज विस्कळीत झाले. आंदोलकांच्या मते ई-चलन प्रणालीमुळे वाहन मालकांवर अन्यायकारक दंड लादला जात आहे. फिटनेस प्रमाणपत्र, परमिट नूतनीकरण किंवा वाहन हस्तांतरणाच्या कामासाठी आधीचे सर्व ई-चलन भरल्याशिवाय प्रणाली पुढे जात नाही. अनेकदा तांत्रिक त्रुटीमुळे किंवा चुकीच्या नोंदींमुळे हजारो रुपयांचे दंड आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका किरकोळ चुकीसाठी पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात असल्याने वाहन व्यवसायावर आर्थिक ताण वाढत असल्याचे संघटनांनी सांगितले.

वाहतूकदार संघटनांनी चुकीची व तांत्रिक त्रुटी असलेली ई-चलने तत्काळ रद्द करावीत, दंडाची रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा द्यावी तसेच थकीत दंडामुळे फिटनेस किवा परमिटची कामे अडवू नयेत, अशा मागण्या केल्या आहेत. मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन, लातूर जिल्हा युवा मोटार मालक संघ, लोकनायक मोटार चालक मालक संघ आणि इतर संघटनांचे पदाधिकारी व वाहन मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन

इतर संघटनांचे पदाधिकारी व वाहन मालक यांनी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. अनेक वाहन मालकांनी आपल्या वाहनांना काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. आम्ही कर, विमा आणि सर्व शुल्क भरतो, मग आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दोन ते तीन तासांच्या चर्चेनंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी ई-चलन ही राज्यस्तरीय ऑनलाइन प्रणाली असून स्थानिक पातळीवर बदल करणे मर्यादित असल्याचे स्पष्ट करत निवेदन वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Transporters protest in latur against e challan fines demand cancellation of incorrect e challans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Latur
  • RTO
  • traffic challan
  • Worker Strike

संबंधित बातम्या

हिरो बनण्याच्या नावाखाली कारमध्ये ‘हे’ बदल कराल तर हमखास रद्द होईल RC, जाणून घ्या RTO चे नियम
1

हिरो बनण्याच्या नावाखाली कारमध्ये ‘हे’ बदल कराल तर हमखास रद्द होईल RC, जाणून घ्या RTO चे नियम

Latur Crime: रात्री घराबाहेर पडल्या, सकाळी विहिरीत मृतदेह; आईसह दोन मुलांचा अंत
2

Latur Crime: रात्री घराबाहेर पडल्या, सकाळी विहिरीत मृतदेह; आईसह दोन मुलांचा अंत

पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; उदगीरच्या अधिवेशनात नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही
3

पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; उदगीरच्या अधिवेशनात नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही

Latur Crime: लातूर हादरलं! 6 वर्षीय पुतण्याचा खून चुलतीनेच केला; 17 तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश
4

Latur Crime: लातूर हादरलं! 6 वर्षीय पुतण्याचा खून चुलतीनेच केला; 17 तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.