मुंबई : एकीकडे आरे कारशेडला पर्यावर्णप्रेमींचा विरोध असताना दुसरीकडे मात्र, आज कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो 3 (Metro 3 Trail) ची ट्रायल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) मेट्रो 3 च्या ट्रायलला हिरवा झेंडा दाखवणार. तसेच सर्वोच्च न्यायालयात आज मेट्रो कारशेडची संदर्भात महत्वाची सुनावणीही होणार आहे.
[read_also content=”शाळेतील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी शिक्षकांसाठी ‘हा’ निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/some-decision-taken-for-teachers-to-prevent-sexual-abuse-in-schools-nrps-320679.html”]
मेट्रो-3 च्या कामाला होणारा विलंब आणि कारशेडचा वाद या दरम्यान, मेट्रोचे ट्रायल रेकही तयार झाले आहेत. एमएमआरसीतर्फे जपान सरकारच्या आर्थिक सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या या बहुउद्देशीय प्रकल्पासाठी राज्य सरकारने आरे येथेच कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. काही संघटनांच्या विरोधानंतर आरेतील कारशेडचे काम सुरू करण्यात आले आहे. एमएमआरसीच्या म्हणण्यानुसार, कारशेड 2024 पर्यंत बांधण्याची योजना आहे. यासह चाचणी देखील सुरू होणार आहे.
[read_also content=”यंदाच्या गणेशोत्सवात बनवा चविष्ट ‘गव्हाच्या पिठा’ चे मोदक https://www.navarashtra.com/latest-news/this-years-ganeshotsav-make-delicious-wheat-flour-modak-320704.html”]