खंडाळा: पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटात आयशर माल ट्रकला शॉर्ट सर्कीटने अचानक आग लागून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.तर या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी की,चालक सकील आलम (वय 23) हा आयशर माल ट्रक प्रदर्शानात असणाऱ्या स्टॉलचे साहित्य घेवून मुंबईहुन बेंगलोरकडे निघाले होते.
अशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटातून मार्गक्रमण करित असताना त्या मालट्रकच्या केबिनमध्ये अचानक शॉर्टसर्कीट होवून आग लागल्याचे समजताच चालक सकील आलम आणि साहित्याचा मालक अमनकुमार बाहेर पडले. यावेळी त्यांनी अग्निरोधक यंत्राच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्यामुळे आगीचा भडका उडाला आणि वाहनासह साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
घटनेचे वृत्त समजताच खंडाळ्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मस्के, महामार्गाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब वंजारे आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. त्यानंतर अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. यावेळी एशियन पेंटस व वाई नगरपरिषदेचे अग्निशामक बंबांच्या सहय्याने आग आटोक्यात आणली. दरम्यानच्या कालावधीत खंडाळ्याच्यादिशेला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास जळीत वाहन बाजूला घेत असताना पुन्हा काहीवेळी खंबाटकी घाटात वाहतूक धिम्यागतीने सुरू होती.
ट्रकची बसला भीषण धडक
पुण्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुण्यातील महत्वाचे ठिकाण असणाऱ्या चांदणी चौकात भीषण अपघात घडला आहे. पुण्याच्या चांदणी चौकात तेलगळती झाल्याने एक ट्रक पलटी झाला आहे. त्यामुळे या ट्रकची बसला भीषण धडक बसली आहे. ट्रक पलटी झाल्यानंतर पाच ते सहा गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या.
Pune Accident: मोठी बातमी! पलटी झालेल्या ट्रकची बसला भीषण धडक; चालक गंभीर…, चांदणी चौकात घडले काय?
पुण्यात पुन्हा भीषण अपघात
बेदरक व निष्काळजी ट्रक चालकामुळे गंगाधाम चौकात दुचाकीस्वार सासऱ्यांना व सूनेला चिरडल्याची घटना ताजी असताना आणखी एक अशीच घटना घडली असून, बेदरक आणि निष्काळजी टुरिस्ट कार चालकाने फुटपाथवरून पायी निघालेल्या महाविद्यालयीन तरुणीला धडक दिली आहे. यात तरुणीचा जागीचं मृत्यू झाला आहे. कात्रजमधील सुखसागरनगरमध्ये भरदुपारी ही घटना घडली असून, कार चालवण्याचे मित्राकडून शिक्षण घेताना ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती राहण्यास कोंढवा- कात्रज रस्त्यावरील एका सोसायटीत होती. ती शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास सुखसागरनगर येथील यशश्री सोसायटीच्या समोरील फुटपाथवरून पायी चालत जात होती. दुपारची वेळ होती. त्यामुळे काही नागरिक देखील रस्त्याच्या कडेला उभारले होते. तेव्हा भरधाव कार फुटपाथावर चढून तिने प्रथम एका नाराळाच्या झाडाला धडक दिली. नंतर कारने श्रेया यांना धडक दिली आणि एका बदामाच्या झाडाला धडकली.