पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात (फोटो- istockphoto)
पुणे: पुण्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुण्यातील महत्वाचे ठिकाण असणाऱ्या चांदणी चौकात भीषण अपघात घडला आहे. पुण्याच्या चांदणी चौकात तेलगळती झाल्याने एक ट्रक पलटी झाला आहे. त्यामुळे या ट्रकची बसला भीषण धडक बसली आहे. ट्रक पलटी झाल्यानंतर पाच ते सहा गाड्या एकमेकांना धडकल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामुळे चांदणी चौकातील वाहतूक ठप्प झाली आहे.
पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात झालेला आहे. तेलगळती झाल्याने एक ट्रक उलटला आणि तो जाऊन बसला धडकला. या दहकेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. या धडकेत बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातामुळे चांदणी चौकात वाहतूक कोंडी झाली आहे.
पुण्यात पुन्हा भीषण अपघात
बेदरक व निष्काळजी ट्रक चालकामुळे गंगाधाम चौकात दुचाकीस्वार सासऱ्यांना व सूनेला चिरडल्याची घटना ताजी असताना आणखी एक अशीच घटना घडली असून, बेदरक आणि निष्काळजी टुरिस्ट कार चालकाने फुटपाथवरून पायी निघालेल्या महाविद्यालयीन तरुणीला धडक दिली आहे. यात तरुणीचा जागीचं मृत्यू झाला आहे. कात्रजमधील सुखसागरनगरमध्ये भरदुपारी ही घटना घडली असून, कार चालवण्याचे मित्राकडून शिक्षण घेताना ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती राहण्यास कोंढवा- कात्रज रस्त्यावरील एका सोसायटीत होती. ती शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास सुखसागरनगर येथील यशश्री सोसायटीच्या समोरील फुटपाथवरून पायी चालत जात होती. दुपारची वेळ होती. त्यामुळे काही नागरिक देखील रस्त्याच्या कडेला उभारले होते. तेव्हा भरधाव कार फुटपाथावर चढून तिने प्रथम एका नाराळाच्या झाडाला धडक दिली. नंतर कारने श्रेया यांना धडक दिली आणि एका बदामाच्या झाडाला धडकली.
Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; भरधाव कारने तरुणीला चिरडले
श्रेया बदामाच्या आणि कारच्या मध्ये अडकली. ज्यात तिला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी येथे धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. चालक सतीश होनमाने (३७, रा. गोकुळ नगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
Pune Accident : पुणे तळेगाव नजीक रस्ते अपघातात सायबर सेक्यूरीटी एक्सपर्टचा मृत्यू
सायबर सेक्यूरीटी एक्सपर्ट तरुणाचा पुणे नजीक तळेगावनजीक अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कार चालकाचाही मृत्यू झाला आहे. बोरीवली येथे राहणारा सायबर सेक्यूरीटी एक्सपर्ट तरुणाचा पुणे नजीक तळेगावनजीक अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कार चालकाचाही मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सायबर सेक्यूरीटी एक्सपर्ट तरुणाचे नाव सचिन महेंद्र देढिया (४१) असे आहे.