ठाणे : कसारा घाटात (Kasara Ghat) धबधबा पॉईंटजवळ पहाटेच्या सुमारास अपघात (Accident) झाला आहे. केळ्याने भरलेल्या ट्रकने आयशरला मागच्या बाजूने धडक दिली. यावेळी ट्रक पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू (Driver Death) झाला.
कसारा घाटातील अपघातानंतर ट्रकमधील केळ्यांचे ट्रे महामार्गावर अस्ताव्यस्त पडले. पप्पू यादव असे मृत ट्रक चालकाचे नाव असून आपत्ती व्यवस्थापन टीम (NDRF Team), महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ट्रकचालकाचा मृतदेह कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Kasara PLC) रुग्णवाहिकेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली असून अपघाती ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढण्यात आले आहे.