Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचे फडणवीसांकडून कौतुक; भेसळखोरांवर कारवाई सुरूच राहणार

महाराष्ट्र FDA च्या भेसळविरोधी मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एकनाथ शिंदे यांनीही कठोर कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 18, 2026 | 03:30 PM
तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचे फडणवीसांकडून कौतुक; भेसळखोरांवर कारवाई सुरूच राहणार

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचे फडणवीसांकडून कौतुक; भेसळखोरांवर कारवाई सुरूच राहणार

Follow Us
Follow Us:
  • तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA कडून भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि अस्वच्छ आस्थापनांवर कारवाई सुरू.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी FDA च्या धडक कारवाईचे कौतुक केले.
  • ‘विमल इलायची’ जाहिरातीप्रकरणी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस.
 

मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची (FDA) धडक कारवाई सध्या चर्चेत आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकणाऱ्या खाद्यपदार्थांविरोधात कारवाईला वेग आल्याचे चित्र आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये FDA च्या पथकांकडून हॉटेल, डेअरी, दुकाने आणि इतर आस्थापनांची तपासणी केली जात आहे. भेसळयुक्त माल आढळल्यास कारवाई करण्याबरोबरच स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवरही परवाना निलंबनासारखी कारवाई केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी FDA च्या कामगिरीचे कौतुक केले आहे. भेसळयुक्त पदार्थांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई आवश्यक असून, सध्या अशी कारवाई सुरू असल्याचा आनंद असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यापुढेही FDA ची धडक कारवाई सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Abhijeet Dipke CJP: आमची मते हवी असतील तर….; हिंगोलीच्या शाळेतून अभिजीत दिपकेंचा राज्य सरकारला थेट इशारा

एकनाथ शिंदेंची तुकाराम मुंढेंसोबत बैठक

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृहात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईची माहिती मुंढे यांनी दिली.

दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. गंभीर प्रकरणांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (MCOCA) कारवाई करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिल्याची माहिती आहे.

न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान कायदेशीर त्रुटी राहू नयेत, यासाठी अनुभवी कायदेतज्ज्ञांची मदत घेऊन विशेष कायदेशीर पथक स्थापन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Dimagi Naxal Party Instagram Trend: पंतप्रधान मोदींच्या ‘दिमागी नक्षल’ विधानाचे सोशल मीडियावर बुमरँग; ‘दिमागी नक्षल पार्टी’ ट्रेंड

शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला FDA ची नोटीस

दरम्यान, FDA च्या कारवाईची व्याप्ती केवळ खाद्यपदार्थ विक्रेते किंवा आस्थापनांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA कडून राज्यभरात सुरू असलेल्या कारवाईमुळे भेसळ आणि खाद्यसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाईचा वेग कायम राहणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

Web Title: Tukaram mundhe fda action devendra fadnavis food adulteration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • FDA
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी यशस्वी डेस्टिनेशन; AI, डेटा सेंटर आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा भर
1

महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी यशस्वी डेस्टिनेशन; AI, डेटा सेंटर आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा भर

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण
2

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रधानमंत्री मोदींसोबत भेट; महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्पांसाठी नेमकी काय झाली चर्चा?
3

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रधानमंत्री मोदींसोबत भेट; महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्पांसाठी नेमकी काय झाली चर्चा?

FDA Complaint System : हॉटेलमध्ये खराब जेवण? थेट करा FDA कडे तक्रार, फक्त QR Code स्कॅन करा, फोटो आणि व्हिडिओ पाठवा
4

FDA Complaint System : हॉटेलमध्ये खराब जेवण? थेट करा FDA कडे तक्रार, फक्त QR Code स्कॅन करा, फोटो आणि व्हिडिओ पाठवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.