Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar reply on Narco test : ‘आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा…!’ रोहित पवारांची एक्स पोस्ट चर्चेत

अजित पवारांच्या हेलिकॉप्टर अपघातावरून संशय व्यक्त करणारे रोहित पवार पुन्हा आक्रमक झाले आहेत. भाजप नेत्यांनी केलेल्या नार्को टेस्टच्या मागणीला प्रत्युत्तर देताना त्यांनी ‘आजच माझी नार्को टेस्ट करा, पण त्यांचीही करा’ असे थेट आव्हान दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 20, 2026 | 07:11 PM
Rohit Pawar demand for narco test today poses challenge to Mahayuti government

Rohit Pawar demand for narco test today poses challenge to Mahayuti government

Follow Us
Follow Us:
  • रोहित पवारांची नार्को टेस्टवर प्रतिक्रिया
  • एक्सवर पोस्ट करत रोहित पवारांनी सुनावले खडेबोल
  • रोहित पवारांनी राज्य सरकारला थेट दिले आव्हान
Rohit Pawar reply on Narco test : दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत आमदार व त्यांचे पुतणे रोहित पवार हे सातत्याने संशय व्यक्त करत आहेत. या अपघात VSR कंपनीच्या हेलिकॉप्टरमध्ये झाल्याने या कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी रोहित पवार करत आहेत. याचबरोबर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर त्यांच्यावर महायुतीच्या नेत्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. यावर रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाल्यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अनेकांनी रोहित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. यावर प्रतिक्रिया देत रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी लिहिले, “अजितदादांच्या अपघातात दोषी असलेल्या VSR कंपनीला क्लिनचिट देण्यासाठी सध्या भलतीच घाई सुरूय. ४० पैशांच्या ट्रोलर्स गँगपासून तर अनेक आमदार-मंत्र्यांपर्यंत सगळेच एकसुरात या कंपनीची पाठराखण करतायेत. एवढा आटापिटा एका कंपनीसाठी करण्यापेक्षा अजितदादांना न्याय मिळण्यासाठी केला असता तर महाराष्ट्राला नक्कीच अभिमान वाटला असता.”

पुढे त्यांनी लिहिले, “दादांना न्याय देण्याऐवजी संपूर्ण सरकारी यंत्रणा एका कंपनीसाठी कामाला लागली असेल, तर VSR आणि ‘त्यांचे’ नेमके काय लागेबांधे आहेत आणि कसे घनिष्ठ संबंध आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. या कंपनीची वकिली करताना स्वाभिमानाचं विसर्जन केलेल्या एका अंधभक्त मंत्र्याने तर चक्क माझी ‘नार्को टेस्ट’ करण्याची मागणी केली. पण माझं सरकारला थेट आव्हान आहे, बिलकूल वेळ दवडू नका, आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा!”

PM Modi Baramati Visit Cancel : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा रद्द, पण कारण काय? शरद पवार स्वतः करणार उद्घाटन

पुढे रोहित पवारांनी लिहिले, ही नार्को टेस्ट करताना अट एकच आहे की, माझ्यासोबत ‘त्यांची’ देखील नार्को टेस्ट करा, म्हणजे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होऊन जाईल. मी कधीही तयार आहे… पण सत्य समोर येण्याच्या भीतीने ‘ते’ या अग्निपरिक्षेला तयार होतील का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

अजितदादांच्या अपघातात दोषी असलेल्या VSR कंपनीला क्लिनचिट देण्यासाठी सध्या भलतीच घाई सुरूय. ४० पैशांच्या ट्रोलर्स गँगपासून तर अनेक आमदार-मंत्र्यांपर्यंत सगळेच एकसुरात या कंपनीची पाठराखण करतायेत. एवढा आटापिटा एका कंपनीसाठी करण्यापेक्षा अजितदादांना न्याय मिळण्यासाठी केला असता तर महाराष्ट्राला नक्कीच अभिमान वाटला असता. पण दादांना न्याय देण्याऐवजी संपूर्ण सरकारी यंत्रणा एका कंपनीसाठी कामाला लागली असेल, तर VSR आणि ‘त्यांचे’ नेमके काय लागेबांधे आहेत आणि कसे घनिष्ठ संबंध आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. या कंपनीची वकिली करताना स्वाभिमानाचं विसर्जन केलेल्या एका अंधभक्त मंत्र्याने तर चक्क माझी ‘नार्को टेस्ट’ करण्याची मागणी केली. पण माझं सरकारला थेट आव्हान आहे, बिलकूल वेळ दवडू नका, आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा! पण अट एकच… माझ्यासोबत ‘त्यांची’ देखील नार्को टेस्ट करा, म्हणजे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होऊन जाईल.
मी कधीही तयार आहे… पण सत्य समोर येण्याच्या भीतीने ‘ते’ या अग्निपरिक्षेला तयार होतील का?
#AjitdadaPawar
#JusticeForAjitdada
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2026

Yogi Adityanath mother passed away : CM योगी आदित्यनाथ यांच्या आईचे उत्तराखंडमध्ये निधन; भाषण सुरू असताना मिळाला निरोप

रोहित पवार यांनी यशवंतराव चव्हाण केंद्रावर पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी सविस्तर सादरीकरण केले. यापूर्वी पुणे-मुंबईत सर्वत्र मफलरचे चित्र असलेले होर्डिंग्ज लावण्यात आले होते, ज्यामुळे हा ‘मफलरवाला’कोण आहे याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. पत्रकार परिषदेत जाहीरपणे दाखवून की तो ‘मफलरवाला’दुसरे कोणी नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, रोहित पवार यांनी संशयाची सुई फडणवीस यांच्याकडे वळवली आहे. फडणवीसांवर आरोप केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवारांनी काय मागणी केली आहे?

    Ans: रोहित पवार VSR कंपनीवर कारवाई आणि अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहेत.

  • Que: नार्को टेस्टबाबत रोहित पवारांनी काय म्हटले?

    Ans: ‘माझी आजच नार्को टेस्ट करा; मात्र माझ्यासोबत त्यांचीही नार्को टेस्ट करा,’ असे आव्हान रोहित पवारांनी दिले आहे.

  • Que: रोहित पवारांनी पत्रकार परिषद कुठे घेतली?

    Ans: रोहित पवार यांनी यशवंतराव चव्हाण केंद्रात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली.

Web Title: Rohit pawar reaction on narco test challenge to cm devendra fadnavis mahayuti government political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Narcotest
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Satara News : साताऱ्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी! शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; शाहू कला मंदिरासाठी ७२ कोटींचा निधी मंजूर
1

Satara News : साताऱ्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी! शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; शाहू कला मंदिरासाठी ७२ कोटींचा निधी मंजूर

Harshwardhan Sapkal : अजितदादांच्या मृत्यू प्रकरणात काहीतरी लपवलं जातंय? सपकाळांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
2

Harshwardhan Sapkal : अजितदादांच्या मृत्यू प्रकरणात काहीतरी लपवलं जातंय? सपकाळांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

CM Devendra Fadnavis: व्याघ्र भ्रमणमार्गाच्या अटींमुळे विकासकामे…; फडणवीसांचे स्पष्ट निर्देश
3

CM Devendra Fadnavis: व्याघ्र भ्रमणमार्गाच्या अटींमुळे विकासकामे…; फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar Plane Crash : ‘अजितदादांचा अपघात की घातपात?’ भास्कर जाधवांचा सरकारला सवाल, मफलर मॅनवरून उपस्थित केले प्रश्न
4

Ajit Pawar Plane Crash : ‘अजितदादांचा अपघात की घातपात?’ भास्कर जाधवांचा सरकारला सवाल, मफलर मॅनवरून उपस्थित केले प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.