Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जितेंद्र आव्हाड आणि अमेय खोपकर यांच्यात रंगलंय ट्विटर वॉर, नक्की घडलंय तरी काय?

मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी दादरमध्ये लावलेल्या बॅनरवरून जितेंद्र आव्हाडांनी काल राज ठाकरेंना टोला लगावत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर अमेय खोपकरांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे.

  • By साधना
Updated On: Jun 15, 2023 | 01:45 PM
jitendra awhad and ameya khopkar

jitendra awhad and ameya khopkar

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यात सध्या ट्विटर वॉर (Twitter War) सुरु आहे. मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी दादरमध्ये लावलेल्या बॅनरवरून जितेंद्र आव्हाडांनी काल राज ठाकरेंना टोला लगावत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर अमेय खोपकरांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. त्याला आता आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे.

नेमकं प्रकरण काय?
काही मनसे कार्यकर्त्यांनी दादरमध्ये राज ठाकरेंचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर्स लावले होते. यावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी “सध्या त्यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे. हा आकडा 50 पर्यंत न्यावा लागेल. फक्त कुणाचीतरी नक्कल करून मुख्यमंत्री होता येत नाही”, असा टोला लगावला होता. त्यावरून मनसेच्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

“जितेंद्र आव्हाड यांना लवकरच मनसेची ब्लू प्रिंट पाठवू. चार खासदार असणारे पंतप्रधानपदाची स्वप्न पाहातात आणि आमच्यावर टीका करतात. जितेंद्र आव्हाड पदवीधर निवडणुकीसाठी नाक घासत शिवतीर्थावर पाठिंबा मागण्यासाठी आले होते”, असा टोला मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी लगावला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही खोचक ट्वीट केलं होतं.

खोपकर काय म्हणाले?
अमेय खोपकरांनी ट्विट केलंय की,“जितुद्दीन आव्हाड यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे. हे कोण बोललं होतं ते सगळ्यांनाच आठवत असेल. आता नागच तो, फणा काढतच फिरणार. पण कितीही फुत्कार निघाले, तरी आम्ही मनसैनिक बिनकामाच्या नागाला अजिबातच महत्त्व देत नाही”.

जितुद्दीन आव्हाड यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे. हे कोण बोललं होतं हे सगळ्यांनाच आठवतच असेल. आता नागच तो, फणा काढतच फिरणार. पण कितीही फुत्कार निघाले तरी आम्ही मनसैनिक बिनकामाच्या नागाला अजिबातच महत्त्व देत नाही.@Awhadspeaks — Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 14, 2023


दरम्यान, अमेय खोपकरांच्या या ट्विटवर जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा खोचक ट्वीट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे हे कोण बोललं होतं ते सगळ्यांना आठवत असेलच. पण त्याला मी दिलेलं उत्तरही लोकांना आठवतं आणि लोक गदगदून हसतात. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे सांगू का? बघा आरश्यात. जशास तसे उत्तर कुणालाही देता येतं. अमेय खोपकर, लवकर बरा हो”, असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमधून दिलं आहे.

माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे … हे कोण बोलले होते हे सगळयांना आठवत असेलच.. पण त्याला मी दिलेले उत्तर पण लोकांना आठवत आणि गदगदुन हसतात…माझा चेहरा नागाच्या फण्या सारखा आहे मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागा सारखा आहे सांगू का ..बघा अर्ष्यात…जश्यास तसे उत्तर कुणालाही… https://t.co/ON7SHnl0Nz — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 15, 2023

दरम्यान, राज्यात एकीकडे शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये जाहिरातीचा वाद चालू असताना दुसरीकडे आव्हाड आणि मनसेमध्ये ट्विटयुद्ध सुुरू आहे.

Web Title: Twitter war betwenn jitendra awhad and ameya khopkar nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2023 | 01:15 PM

Topics:  

  • ameya khopkar
  • political news

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस
2

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा
3

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

Shivsena Dussehra Melava : तेव्हा तुम्ही कुठल्या गोधडीत मुतत होता? शिंदे गटावर टीका करताना संजय राऊतांचा गेला तोल
4

Shivsena Dussehra Melava : तेव्हा तुम्ही कुठल्या गोधडीत मुतत होता? शिंदे गटावर टीका करताना संजय राऊतांचा गेला तोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.