
राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार? अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; तर तरुण आमदारांना...
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. भाजप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत आहेत. येत्या डिसेंबरमध्ये नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महायुती सरकारला नोव्हेंबरमध्ये दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारच्या कामकाजाचा आढावा घेताना काही मंत्र्यांच्या कामगिरीचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांना वगळून तरुण आणि सक्रिय आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्याचा पर्याय महायुतीतील तिन्ही पक्षांसमोर असल्याचे बोलले जात आहे.
जेन-झी आंदोलनाने तरुणांची लॉटरी
गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह देशात विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आणि तरुणांकडून आंदोलने केली जात आहेत. त्यामुळे सरकारमध्ये नव्या दमाच्या तरुण नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळासोबतच पक्ष संघटनांमध्ये तरुणाईला अधिक प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दा या निमित्ताने महत्त्वाचा ठरू शकतो.
शिंदेंची नाराजी भोवणार
शिवसेना शिवसेनेत शिंदे हे काही मंत्र्यांच्या कामकाजावर नाराज असल्याची चर्चा असून, राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये बढ़ती मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
रिपोर्टकार्ड तपासून फेरबदल
भाजपमध्येही संघटनात्मक आणि प्रशासकीय कामकाजाच्या निकषांवर मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासून त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये काहिसे बदल केले जाऊ शकतात.
पक्षासाठी हवे नवे नेतृत्व राष्ट्रवादी
राष्ट्रवादी गटाचा आणि काँग्रेसच्या अजित पवार विस्तार आगामी राजकीय आव्हाने लक्षात घेऊन नव्या नेतृत्वाला संधी देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.