वसतिगृहात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
नागपूर : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात फलटणजवळ विसाव्यासाठी नागपुरातील थांबलेल्या दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. मधुकर तुकारामजी शेंडे (वय ५६, राजाबक्षा, नागपूर) व तुषार रामेश्वर बावनकुळे (वय २२) असे मृतक वारकऱ्यांची नावे आहेत.
शेंडे आणि बावनकुळे हे दोघेही निस्सिम विठ्ठलभक्त होते. शेंडे हे नेहमीप्रमाणे यंदादेखील उत्साहाने वारीत सहभागी झाले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रविवारचा मुक्काम बरड (ता. फलटण) येथे होता. बरड जवळील टोलनाका येथे मुक्कामसाठी टेंट उभारताना तुषार याने लोखंडी रॉडला हात लावल्यानंतर त्यांना शॉक बसला.
हेदेखील वाचा : कंत्राटदाराचा मनमानी कारभार; वाखरी ते पंढरपूर रस्त्याच्या दुपदरीकरणाचे भिजत घोंगडे
दरम्यान, तुषार रॉडला चिटकल्याने त्यांना बाजूला काढण्यासाठी पुढे आलेले मधुकरराव हेही तुषार यांना चिटकले. तेव्हा दोघांना विजेचा शॉक बसला. त्यावेळी जवळच्या काही वारकऱ्यांनी तत्काळ १०८ अॅम्ब्युलन्सला कॉल केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. यामध्ये दोन्ही वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता.
वारकऱ्यांकडून हळहळ व्यक्त
रविवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे त्यांच्या सहकारी वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. शेंडे हे अविवाहित होते व त्यांनी संपूर्ण जीवन वारकरी सेवा व समाजसेवेला अर्पण केले होते. ते बावणे कुणबी समाज केंद्रीय संस्थेचे सक्रिय सदस्य होते. विविध सामाजिक संघटनांशी ते जुळले होते. तसेच सत्संग व विविध धर्मकार्यातदेखील सहभागी व्हायचे. त्यांच्यावर सोमवारी नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वारकऱ्यांना मदत मिळणार
पंढरपूर आषाढी वारीला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी सरकारने एक दिलासा देणारा आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि अनपेक्षित घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळावा यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता वारीदरम्यान कोणत्याही अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना थेट ४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. महसूल विभागाने यासंदर्भातील परिपत्रक आजच जाहीर केलं आहे.