वाखरी ते पंढरपूर रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम रखडल्याने वारकऱ्यांचे हाल
क्षणिक आनंद महागात पडला! हवेत लटकताच आत्मा गेला सोडून, बंजी जंपिंग करताना हाड मोडलं अन् जागीच
या संपूर्ण प्रकरणावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.आषाढी वारीसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांना वाखरी ते पंढरपूर दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आणि अपूर्ण कामामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावर टाकलेला निकृष्ट दर्जाचा, मातकट मुरूम निसरडा झाला असून, अनेक ठिकाणी घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून, अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे.
Bangladesh Politics : बांगलादेशाच्या राकारणात पुन्हा मोठी उलथापालथ; संविधान स्थगित करण्याचा निर्णय
“रस्त्याची स्थिती पाहून मन सुन्न होतं. वारकरी कसे सुरक्षित पोहोचणार? प्रशासनाने तातडीने लक्ष घालावं,” अशी मागणी पुण्यातील वारकरी श्याम पाचडे यांनी केली आहे.
वाखरी-पंढरपूर मार्गावर सुरू असलेल्या दुपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराची मनमानी दिसून येत असून, काम अत्यंत संथ गतीने आणि निष्काळजीपणे सुरू आहे. अपूर्ण काम आणि मुरूमाच्या निकृष्ट प्रतीमुळे रस्ता विस्कळीत झाला आहे. प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार माध्यमांतून तक्रारी जाऊनही ठोस कारवाई होत नसल्याने वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. “पावसात अपघात झाले, तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवालही वारकरी विचारत आहेत.