Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Budget 2025 : उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आले आमनेसामने; विधानभवनाच्या लॉबीत नक्की काय घडलं?

अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधानभवनाच्या लॉबीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले होते. मात्र दोघांना ना हस्तांदोलन केलं ना नजरेला नजर भिडवली.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 10, 2025 | 05:36 PM
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आले आमनेसामने; विधानभवनाच्या लॉबीत नक्की काय घडलं?

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आले आमनेसामने; विधानभवनाच्या लॉबीत नक्की काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:

अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधानभवनाच्या लॉबीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले होते. मात्र दोघांना ना हस्तांदोलन केलं ना नजरेला नजर भिडवली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला. फडणवीसांनी ठाकरेंशी हस्तांदोलनही केलं. त्यामुळे याची चर्चा सध्या रंगली आहे.

काय झालं संभाषण?

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व नेते विधानभवनाच्या लॉबीत आले होते. यावेळी एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसते. यावेळी देवेंद्र फडणवीस आणिर उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाले. यावेळी फडणवीस आले, नमस्कार केला, उद्धव ठाकरे म्हणाले म्हणाले – काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत. त्यावर सगळे (अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर) सगळे खळाळून हसले, आणि पुढे निघून गेले.

विधानसभेच्या सभागृहात राजकीय नेते एकमेकांवर आरोप करत असतात. परंतु बाहेर भेटल्यावर मिश्कील टोलेबाजी करत असतात. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत? असं म्हणण्याचं कारण म्हणजे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आहेत. त्यांनी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात एका परिसंवादात शिवसेना उबाठावर गंभीर आरोप केला होता. शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज घेतल्या जातात, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर शिवसेनेने त्यांच्या या विधानाचा समाचार घेतला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे आज अचूक वेळ साधत टोला लगावला.

दादा, तुमचा हा अर्थसंकल्प नाही…

अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प तुटीचा आहे. अनेक योजनांचा खर्चाचा बोजा त्यात आहे. त्यामुळे कोणतीही मोठी घोषणा अर्थसंकल्पात दिसत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना दादा, तुमचा हा अर्थसंकल्प दिसत नाही, असे म्हटले.

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे दिसताच न थांबता पुढे निघाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. उद्धव ठाकरेसुद्धा एकनाथ शिंदे यांना पाहून थांबले नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये विसंवाद अजून कायम असल्याचे दिसून आले.

Web Title: Uddhav thackeray and eknath shinde came face to face in the lobby vidhan bhavan during maharashtra budget 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 04:19 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra budget session
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला; धारधार शस्त्राने सपासप वार
1

एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला; धारधार शस्त्राने सपासप वार

Thane Politics: …तर एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार? ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदे गटात खळबळ
2

Thane Politics: …तर एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार? ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदे गटात खळबळ

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला गावी जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर, टोलमाफी संदर्भात एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
3

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला गावी जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर, टोलमाफी संदर्भात एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Raj Thackeray CM Fadnavis Meet : राज यांच्या मनात नेमकं काय? वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय खलबत
4

Raj Thackeray CM Fadnavis Meet : राज यांच्या मनात नेमकं काय? वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय खलबत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.