Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव ठाकरे ठरले मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी; ‘तो’ फोटो ट्विट करीत भाजपकडून ठाकरे गटावर जोरदार पलटवार

Uddhav Thackeray vs BJP : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सभांमधून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत, विकासाच्या मुद्द्यावर भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. सरकारकडून विकासच झाला नाही, अशी टीका त्यांनी आपल्या भाषणांमधून केली. त्यानंतर ते 'वंदे भारत' एक्स्प्रेसने मुंबईत आले. भाजपने यावरून ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधत तो फोटोच ट्विट केला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 06, 2024 | 06:54 PM
Uddhav Thackeray became the beneficiary of Modi government's development; BJP targets Thackeray group by tweeting photo of Konkan-Mumbai journey, read detailed report

Uddhav Thackeray became the beneficiary of Modi government's development; BJP targets Thackeray group by tweeting photo of Konkan-Mumbai journey, read detailed report

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सभांमधून भाजपवर जोरदार निशाणा साधत, पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधानांनी कोकणात येऊन कोकणाला काय दिले, असा सवालसुद्धा ठाकरेंनी विचारला. विकासाच्या मुद्द्यावरच भाजपला घेराव घालत कुठे गेला विकास, असा खरमरीत सवाल केला. भाजपने उद्धव ठाकरेंचा कोकण- मुंबई रेल्वे प्रवासाचा फोटो ट्विट करीत जोरदार पलटवार केला आहे. त्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांचा वंदे भारतमधील प्रवासाचा फोटो ट्विट करत तिसरी बार….. मोदी सरकार !, असे दोन शब्दांचे कॅप्शन दिले आहे. भाजपकडून यासंदर्भात दोन फोटो ट्विट केले गेले आहे.

हीच तर #ModiKiGuarantee

कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेन मधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं.

लवकरच बुलेट ट्रेन ची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण #ModiHaiToMumkinHai#विरोधक_देखील_लाभार्थी @ShivSenaUBT_ @OfficeofUT pic.twitter.com/KnznkvNU3d

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 6, 2024

वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची भुरळ सर्वच भारतीय रेल्वे प्रवाशांना पडली आहे. मग ‘वंदे भारत’मधून प्रवासाचा आनंद सर्वसामान्यांप्रमाणे राजकारणी लोकही घेत असतात. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस असो की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार असो, यांनीही ‘वंदे भारत’ रेल्वे प्रवासाचा आनंद घेतला आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास केला.

मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी

वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास

तिसरी बार….. मोदी सरकार !#Modikiguarantee pic.twitter.com/xUPFUF1e2z

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 6, 2024

कोकणातून मुंबई वंदे भारतने प्रवास
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चार आणि पाच फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर होते. कोकणातून घेतलेल्या सभांमधून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. सरकारकडून विकास झाला नाही, असे त्यांनी आपल्या भाषणांमधून टीका केली. त्यानंतर उद्धव ठाकरे संध्याकाळी खेड स्थानकावरुन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसले आणि खेड ते मुंबई प्रवास वंदे भारत एक्स्प्रेसमधून केला.
मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी
वंदे भारत एक्सप्रेस ही नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी प्रकल्प आहे. बुलेट ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनसाठी मोदी सरकारने मोठे काम केले आहे. त्यामुळे भाजपने उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारत प्रवासाचे दोन फोटो ट्विट केले आहे. पहिल्या फोटोत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत विनायक राऊत दिसत आहे. भाजपने म्हटले आहे की, मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसरी बार….. मोदी सरकार !
उद्धव ठाकरे यांना लवकरच बुलेट ट्रेनची सफर
दुसऱ्या एका फोटोवर भाजप महाराष्ट्राकडून कॅप्शन दिले गेले आहे की, कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं. लवकरच बुलेट ट्रेनची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण…भाजपने हे फोटो उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना टॅग केले आहेत.

Web Title: Uddhav thackeray became the beneficiary of modi governments development bjp surrounded by tweeting that photo nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2024 | 03:43 PM

Topics:  

  • Rashmi Thackeray
  • Uddhav Thackeray
  • vande bharat express

संबंधित बातम्या

Raj Thackeray CM Fadnavis Meet : राज यांच्या मनात नेमकं काय? वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय खलबत
1

Raj Thackeray CM Fadnavis Meet : राज यांच्या मनात नेमकं काय? वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय खलबत

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
3

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
4

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.