
"राज ठाकरे यांच्या कायदेशीर मुसक्या..., श्रीमुखातून माणसाची औलाद ", सदावर्तेंचा राज-उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Gunratna Sadavarte on Raj and Uddhav Thackeray : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून 15 जानेवारील 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे तर 16 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी युती आणि आघाडी झाल्याचे समोर आले असून उद्या म्हणजेच 11 जानेवारीला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर सभा होणार आहे. याचदरम्यान आता या सभेला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शविला आहे.
गुणरत्न सदावर्ते हे राज्यात नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी याआधी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांना देखील विरोध केला होता. त्यानंतर आता त्यांनी ठाकरेंच्या सभेलाही विरोध केला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या सभेवरून राज आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंना पर्यावरणाचा पुळका असल्याचे दिसतं आहे. एक बोट दुसरीकडे दाखवता मात्र ४ बोट आपल्याकडे असतात. उच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार तिथे राजकीय पक्षांना हक्काने सभा घेण्याचा अधिकार देण्यात आला नाही. सभे विरोधात आम्ही तक्रार केली असून ध्वनी प्रदूषण बाबत तक्रार आहे, ते कोर्टाचे अवमान करत आहेत,अशी टिका सदावर्ते यांनी यावेळी केली.
राज ठाकरे यांच्या कायदेशीर मुसक्या आवळण गरजेच आहे. श्रीमुखातून माणसाची औलाद आहे असेच बोलावे लागेल. राज ठाकरे हा भोंगे बाबा आहे, यांचा कंठ भोंग्यासारखा भौ करतो. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर चौथरा विनापरवानगी केलं आहे. बाळ ठाकरेंच्या पुतळा कुलाबा येथे उभा केला आहे, याला डिफेन्सची परवानगी आहे का? उद्धव ठाकरे यांनी भाईजान मामूजाण केलं, टोल वाजवले जात आहे. राज ठाकरेंची काळेकुट्ट कारकिर्द, फक्त कोहिनूर पर्यंत चर्चा राहणार नाही सर्व चर्चा होईल, अशी टिका सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर केली.
राज ठाकरे अपने गिरबन झाक कर देखो, हा संघ भारत आहे. जसे तुम्ही मुंबईत बसला आहे. अन्नमलाई साहेबांनी बरोबर सांगितलं आहे, मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. दुनियाच मोठे सेंटर आहे, त्यामुळे तिला तुकड्यात पाहता येत नाही. ते कायदा सुव्यवस्था पाहतात. तसेच लवकरच धनंजय मुंडे मंत्री झाले पाहिजेत, ही सर्व बहुजन समाजाची इच्छा आहे.