Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray News: ‘मुंबईला देवेंद्र फडणवीसांचे नाव माहिती नव्हते तेव्हापासून’; उद्धव ठाकरेंनी डिवचलं

भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, अमित साटम यांच्यासारख्या नेत्यांना महापालिका आणि मंत्रालयाचा मार्ग शिवसेनेनेच दाखवला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 11, 2026 | 03:09 PM
Uddhav Thackeray on BMC Election 2026:

Uddhav Thackeray on BMC Election 2026:

Follow Us
Close
Follow Us:
  • महापालिका निवडणुकांसाठी अवघे चार दिवस उरले आहेत
  • मुंबईच्या विकासात भाजपचा काडीचा संबंध नाही
  • देवेंद्र फडणवीस हे नाव मुंबईला माहिती नव्हतं तेव्हापासून आम्ही कोस्टल रोडची तयारी सुरु केली होती
Uddhav Thackeray Criticized Devendra Fadnavis: मुंबई महानगरपालिकेसह इतर महापालिका निवडणुकांसाठी अवघे चार दिवस उरले आहेत. सर्व राजकीय पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. सर्व पक्षांचा प्रमुख नेत्यांकडून पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहचवले जात आहेत. यंदाच्या निवडणुकांची चुरसही चांगलीच वाढली आहे. या सगळ्यातच माजी मुख्यमंत्री ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.

“मुंबईचा कोस्टल रोड आम्ही केल्याचा दावा करत देवेंद्र फडणवीस हे नाव मुंबईला माहिती नव्हतं तेव्हापासून आम्ही कोस्टल रोडची तयारी सुरु केली होती, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना असा टोला लगावला. आम्ही मुंबईत विविध सेवा-सुविधा सुरू केल्या मुंबईच्या विकासात भाजपचा काडीचा संबंध नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपलाही धारेवर धरलं आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना ही तर शाहसेना झाली आहे. भाजपला महाराष्ट्रातील मराठी मते फोडायची असल्यामुळेच त्यांनी शिंदेंना फोडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Mahayuti Mumbai Manifesto : महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध; मराठी माणसांसाठी केल्या

भाजपकडून विकास आणि मराठी माणसांच्या मुद्द्यावरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप सध्या ज्या प्रकारचा विकास राबवत आहे, तो विकास नसून विनाश आहे, असा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्हाला विकास नको असा आरोप केला जातो, तो चुकीचा आहे. आम्हाला विकास हवा आहे, पण नियोजनशून्य विकास मुंबईला विनाशाकडे घेऊन जात आहे.” तसेच, “शिवसेना नसती, तर भाजपला मंत्रालय दिसले असते का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, अमित साटम यांच्यासारख्या नेत्यांना महापालिका आणि मंत्रालयाचा मार्ग शिवसेनेनेच दाखवला. मंत्रिपद कुणी दिलं? फडणवीस पहिल्यांदा कुणाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “आज यांच्या हातात जास्तीत जास्त सत्ता आहे. मात्र, त्यांनी मराठी माणसासाठी नेमकं काय केलं? मराठी माणसाला घर नाकारणारेच आता आम्हाला विचारत आहेत की आम्ही मराठी माणसांसाठी काय केलं?” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाच्या शिवसेनेवरही जोरदार टीका केली.

West Bengal ED Raid: कोलकाताहून आय-पीएसीच्या गोवा कार्यालयात २० कोटी रुपये पोहोचले…

दरम्यान आज महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. महायुतीचा वचननामा सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट ओपन चॅलेंज दिले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा मुद्दा दाखवून दिल्यास पाच हजार रुपये देईन, असे आव्हान फडणवीस यांनी यावेळी दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या भाषणांपैकी ९५ टक्के भाग विकासावर आधारित असतो. मात्र उद्धव ठाकरे विकास दाखवत नाहीत. हिंदुत्व हा आमचा मुद्दा आहे आणि त्यावर आम्हाला अभिमान आहे. त्यांनी लवकरच मला एक लाख रुपये पाठवावेत. कारण माझ्या भाषणात केवळ विकास असतो. हे पैसे मी लाडक्या बहिणींना देईन,” असेही त्यांनी नमूद केले.

 

Web Title: Bmc election 2026 since before mumbai even knew devendra fadnaviss name we have been uddhav thackeray taunts fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • BMC Election
  • devendra fadnavis
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

DPC funds : ‘डीपीसी’चा निधी मुख्यमंत्र्यांकडून रद्द; नांदेडच्या भाजप नेत्यांना मोठा धक्का
1

DPC funds : ‘डीपीसी’चा निधी मुख्यमंत्र्यांकडून रद्द; नांदेडच्या भाजप नेत्यांना मोठा धक्का

Mahayuti Mumbai Manifesto : महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध; मराठी माणसांसाठी केल्या ‘या’ खास घोषणा
2

Mahayuti Mumbai Manifesto : महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध; मराठी माणसांसाठी केल्या ‘या’ खास घोषणा

Devendra Fadnavis : सोलापूरकरात दररोज पाणीपुरवठा अन् यंत्रमागधारकांसाठी ‘इचलकरंजी पॅटर्न’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
3

Devendra Fadnavis : सोलापूरकरात दररोज पाणीपुरवठा अन् यंत्रमागधारकांसाठी ‘इचलकरंजी पॅटर्न’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

“राज ठाकरे यांच्या कायदेशीर मुसक्या…, श्रीमुखातून माणसाची औलाद “, सदावर्तेंचा राज-उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
4

“राज ठाकरे यांच्या कायदेशीर मुसक्या…, श्रीमुखातून माणसाची औलाद “, सदावर्तेंचा राज-उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.