Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र’; आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी वाढल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 14, 2025 | 10:00 PM
'पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र'; आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

'पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र'; आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी वाढल्या आहेत. शिवाय जो आक्रमकपणा होता तोही थोडासा मावळला आहे.त्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा युती होणार, अशा चर्चा असातानाच ‘ पढील मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या परिवर्तनामध्ये उद्धव ठाकरेंनी सहभागी व्हावे, तिळगूळ खावे आणि गोड गोड बोलावे अशी विनंती आहे, असेही रवी राणा यांनी म्हटलं आहे. युवा स्वाभिमान पक्षातर्फे रवी राणा यांच्या पुढाकाराने मंगळवारी मालखेड मार्गावरील हनुमान गढी येथे मकर संक्रांतीनिमित्त पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

रवी राणा म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे आले आहेत. पुढच्या मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांसोबत दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी खुल्या मनाने स्वीकारले तर नक्कीच हे होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाणार आहे. त्यांच्यात नेतृत्वात आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा- युवा स्वाभिमान पक्ष रिंगणात उतरेल. कुठल्याही निवडणुकीत आम्ही एकत्रित राहू असेही आमदार रवी राणा यांनी सांगितले.

विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर आदित्य ठाकरे हे देखील आतापर्यंत तीन वेळा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. शिवाय ठाकरे गटाच्या ‘सामना’मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले. तसेच उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, असे विधान फडणवीसांनी केले होते. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना रवी राणा यांनी मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राजकारणात लोकांनी दिलेला निर्णय स्वीकारला पाहिजे. अचलपूरमधून मतदारांनी भाजपचे प्रवीण तायडे हे सक्षम आमदार निवडले आहेत. प्रवीण तायडे मतदारसंघात जी काही विकासकामे करतील त्यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला पाहिजे, अशी आशा रवी राणा यांनी व्यक्त केली. लोकशाहीत पराभव झाल्यानंतर तो स्वीकारून सगळ्यांनी अमरावतीच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे. विरोधकांनी तिळगूळ खावे आणि गोड गोड बोलावे, विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहनही रवी राणा यांनी स्थानिक राजकीय नेत्यांना केले आहे. रवी राणा यांनी याआधी बच्चू कडू यांनी चहा पिण्यासाठी यावे, असे आमंत्रण देखील दिले होते.

Web Title: Uddhav thackeray devendra fadnavis will be together on next makar sankranti amravati mla ravi rana claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 09:23 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • MLA Ravi Rana
  • Shiv Sena UBT Chief Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

“शासन, समाजाने नशामुक्तीचा संदेश …”; काय म्हणाले मंत्री Mangal Prabhat Lodha?
1

“शासन, समाजाने नशामुक्तीचा संदेश …”; काय म्हणाले मंत्री Mangal Prabhat Lodha?

इंधन संकटावर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा; “पेट्रोल-डिझेलची साठेबाजी खपवून घेणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका!”
2

इंधन संकटावर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा; “पेट्रोल-डिझेलची साठेबाजी खपवून घेणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका!”

“येत्या काळात महाराष्ट्र डेटा सेंटर…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
3

“येत्या काळात महाराष्ट्र डेटा सेंटर…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Mumbai Tech Week: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4

Mumbai Tech Week: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.