मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, प्रवक्त्याने सोडला पक्ष, या पक्षात करणार प्रवेश
मुंबई: “महायुतीच्या जिंकलेल्या उमेदवारांचे अभिनंदन. हा निकाल म्हणजे लाटेपेक्षा त्सुनामी आली असा हा निकाल आहे. पण हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटतोय की नाही, ही शंका आहे. थोडक्यात विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही अशी आकडेवारी आहे. जे.पी नड्डा बोलले होते. या देशात एकच पक्ष राहील म्हणजे यांना या देशात वन नेशन, वन इलेक्शन, वन पार्टी असंच हवं आहे याच दिशेने त्याची आगेकूच चालली आहे, ” अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, “पण आम्ही राज्यभरात ज्या सभा घेतल्या.पण जनतेने महायुतीला मतदान का केल. सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाची खरेदी दिली जात नाही म्हणून दिली का, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जात आहेत म्हणून दिली का, महिलांना सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे, म्हणून त्यांना मते दिली का, नक्की कोणत्या रागापोटी ही लाट उसळली आहे. हे कळत नाहीये हा निकाल अनाकलनीय आहे. याचं गुपित शोधावं लागेल. पण तुर्तास तरी आपण निराश होऊ नका, काहीच्या मते हा ईव्हीएमचा विजय आहे.
महाराष्ट्राच्या जनतेला निकाल मान्य असेल तर…
आजचा निकाल महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर कोणीच काही बोलण्याची गरज नाही. जर हा निकाल मान्य नसेल तर प्राणपणाने आम्ही महाराष्ट्रासाठी लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी लढत राहू, आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो की आम्ही त्यांच्यासोबत आहोत. लाडकी बहीण योजनेमुळे जर हा विजय मिळाला असेल तर सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही , शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज, वाढणारी बेरोजगारी आहे. लाडकी बहिणीपेक्षा ज्या महिला आमच्या सभेला येत होत्या, त्यांचं म्हणणं होतं घर कसं चालवायचं?
महागाई वाढतेय त्यामुळे महिलांनी महायुतीला मतदान केलं का, यावेळेला तरी अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडी फार प्रामाणिकपणे वागली ही आमची चूक झाली का, असं आम्हाला वाटतंय. पण महाराष्ट्राची जनता माझ्यासोबत अशी वागेल यावर माझा विश्वास नाही. या निकालात नक्कीच काहीतरी गडबड आहे असे पराभवानंतर पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
जनतेचा कौल
भाजपला या निवडणुकीत जनतेने कौल दिला असून सर्वांना एक धक्का बसला आहे. एक्झिट पोल आणि विश्लेषकांचे अनेक अंदाज चुकवत भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत बाजी मारली आहे आणि जनतेचा कौल आल्यानंतर आता हतबल होत उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया पत्रकारांसमोर दिली आहे. आपण प्रामाणिकपणे वागूनही चूक झाल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं आहे. तर जनतेने जर असा कौल दिला असेल तर मान्य असून जिंकणाऱ्यांचं अभिनंद त्यांनी यावेळी केलंय.