Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray Live : देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू…”; उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची महापालिका निवडणुकीमध्ये युती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी शिवशक्ती वचननामा असा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 04, 2026 | 02:31 PM
खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आता आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन...

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आता आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन...

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे बंधूंचा जाहीरनामा प्रसिद्ध
  • शिवशक्तीचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला
  • उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
Uddhav Thackeray Live : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. 29 महापालिकांसाठी निवडणूका जाहीर झाल्या असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा जोरदार धडाडत असून ठाकरे बंधूंच्या युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई पालिकेवर वर्चस्व कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन दशकांनंतर एकत्र आले आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. शिवशक्तीचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शिवशक्तीचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राहुल नार्वेकर यांनी कुलाबामधील विरोधी इच्छुक उमेदवारांना धमकवल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “राहुल नार्वेकर हे सभागृहात सभापती. बाहेर आमदार आहे. नाव घेऊन बोलतो. एक आमदार दमदाटी करतो. समोरच्याचं संरक्षण काढून घेऊन दमदाटी करत आहे. अध्यक्षाची निलंबन करा. अध्यक्ष निष्पक्षपाती असतात. ते कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ नये असा हा अलखित दंडक आहे. त्यांनी त्याला छेद देणारं वर्तन केलं आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांवर निशाणा साधला.

हे देखील वाचा : बंडखोरांना शिवसेनेचा दणका; विरोधात अर्ज भरणाऱ्या 26 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

पुढे ते म्हणाले की, “देशात झुंड शाही सुरू आहे. आपल्या देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाली आहे. आम्ही त्यांची मतचोरी पकडली. आता त्यांनी उमेदवारांची पळवापळवी सुरू केली आहे. साम दाम दंड भेद करुन निवडणूक जिंकायची. निगरगट्ट राज्यकर्ते लाभले आहेत. बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजकीय नेत्यांसह निवडणूक आयोगावर देखील जोरदार हल्लाबोल केला.

हे देखील वाचा : भाजपाचा संकल्पनामा तर बनवाबनवी! नांदेडमध्ये महायुतीच्याच नेत्याने साधला निशाणा

उद्धव ठाकरे म्हणाले की, “विश्वास ठेवायचा तरी कुणावर. निवडणूक आयोगावर दम असेल तर त्यांनी निवडणूक रद्द करावी. आरओ होते त्यांचे फोन रेकॉर्ड काढा. की तेही रेकॉर्ड सीसीटीव्ही फुटेज सारखं डीलिट केलं का. बिनविरोध निवडणुका कशा होतात. हे निवडणूक आयोगाचं नाटक आहे. त्यांनी निकाल राखून ठेवला. पुन्हा निकाल तोच जाहीर करतील.त्यांच्यात हिम्मत असेल तर निवडणूक रद्द करा. जेनझीचा मतदानाचा अधिकार काढून घेतला आहे. केवळ निवडणूक निकाल रोखू नका. तुम्ही तिथल्या निवडणुका रद्द करा. नाही तर तुम्ही गुलाम आहात हे लोकांमध्ये जाईल,” असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे.

Web Title: Shivsena mns manifesto shivshakti vachannama uddhav thackeray live political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Maharashtra Local Body Election
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

ठाकरे गटाच्या आमदारांची आज ‘मातोश्री’वर महत्त्वपूर्ण बैठक; बैठकीत नेमकं काय घडणार?
1

ठाकरे गटाच्या आमदारांची आज ‘मातोश्री’वर महत्त्वपूर्ण बैठक; बैठकीत नेमकं काय घडणार?

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ‘रामाचा मार्ग स्वीकारला तरच भलं होईल…’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना थेट टोला
2

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ‘रामाचा मार्ग स्वीकारला तरच भलं होईल…’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना थेट टोला

‘ऑपरेशन टायगर 3 कधी होईल तेही कळणार नाही’; ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटात येणार? शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचे  मोठे विधान
3

‘ऑपरेशन टायगर 3 कधी होईल तेही कळणार नाही’; ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटात येणार? शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचे मोठे विधान

‘एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल’; रामदास आठवलेंचा दावा, आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला
4

‘एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल’; रामदास आठवलेंचा दावा, आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.