Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Elections News: वरळीत बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; नाराजांची मनधरणी सुरू

राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत बंडखोरीची शक्यता लक्षात घेता ठाकरे गटाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 01, 2026 | 10:15 AM
Mumbai Elections News: वरळीत बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; नाराजांची मनधरणी सुरू

Mumbai Elections News: वरळीत बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; नाराजांची मनधरणी सुरू

Follow Us
Close
Follow Us:
  • बंडखोरी टाळण्यासाठी मातोश्री अॅक्टिव्ह मोडवर
  • उद्धव ठाकरेंकडून नाराज निष्ठावंतांची मनधरणी
  • शिवसैनिकांची मध्यरात्री घेतली बैठक
Mumbai Elections News: राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उमेदवारीवरून अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत आहेत. इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्याने बंडखोरीची शक्यता लक्षात घेता शिवसेना ठाकरे गटाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मातोश्री सध्या पूर्णपणे ‘अॅक्टिव्ह मोड’ वर असल्याचे चित्र आहे. ठबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेत नाराज पदाधिकारी आणि उमेदवारांची मनधरणी सुरू केली आहे. विशेषतः आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होऊ नये, यासाठी मध्यरात्री मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची माहिती आहे. एबी फॉर्म वाटपावेळी वरळीमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा: BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली ८६ उमेदवारांची यादी जाहीर

प्रभाग क्रमांक १९३ मध्ये हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देण्यात येत असताना सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिल्याने हा वाद अधिक चिघळला. तर प्रभाग क्रमांक १९६ मध्ये विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने महिला शाखाप्रमुख संगीता जगताप आणि युवासेना पदाधिकारी आकर्षिका पाटील नाराज झाल्या होत्या. तसेच प्रभाग क्रमांक १९७ मनसेला सोडल्याने काही पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनाम्याचा इशाराही दिला होता.

हेही वाचा: Mumbai Cyber Fraud: आता चोरांनी थेट हद्दच केली पार! सरन्यायाधीशांच्याच नावाचा केला वापर; महिलेची ३ कोटी ७५ लाखांची ऑनलाइन लूट

बंडखोरी होणाऱ्या प्रभागांचा आढावा अनिल परब घेणार भेट घेणार आहेत. सर्व नाराज नेत्यांना आणि एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांना मध्यरात्री मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत नेमका कोणता तोडगा निघाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती नसली तरी वरळीमध्ये नाराजीचा फटका बसेल का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. संभाव्य बंडखोरी होणाऱ्या वॉर्डीचा आढावा घेण्याची जबाबदारी खासदार अनिल परब यांच्यावर सोपवण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत नाराजांची समजूत काढून बंडखोरी रोखण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत राजकीय खेळी पाहायला मिळणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Uddhav thackeray enters the fray to prevent rebellion in worli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 10:15 AM

Topics:  

  • BMC
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

शिंदे गटाच्या नेत्याने आपल्या पक्षातील उमेदावाचा एबी फॉर्म थेट टाकला खाऊन; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

शिंदे गटाच्या नेत्याने आपल्या पक्षातील उमेदावाचा एबी फॉर्म थेट टाकला खाऊन; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Maharashtra Municipal Election 2026: निवडणुकीपूर्वीच भाजपचे ४ उमेदवार विजयी; तर शिंदे सेनेला मुंबईत धक्का
2

Maharashtra Municipal Election 2026: निवडणुकीपूर्वीच भाजपचे ४ उमेदवार विजयी; तर शिंदे सेनेला मुंबईत धक्का

कर्करोग लवकर हेरण्यासाठी पालिकेचा मोठा उपक्रम; ३ लाख नागरिकांचे इन्स्पेक्शन, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी मोहीम
3

कर्करोग लवकर हेरण्यासाठी पालिकेचा मोठा उपक्रम; ३ लाख नागरिकांचे इन्स्पेक्शन, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी मोहीम

Municipal Election 2026: राज्यातील १४ ठिकाणी भाजप-शिंदे गटाची युती फुटली; कोणत्या आहेत या महापालिका?
4

Municipal Election 2026: राज्यातील १४ ठिकाणी भाजप-शिंदे गटाची युती फुटली; कोणत्या आहेत या महापालिका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.