Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब

पुण्यात रविवारी रात्री ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात बैठक पार पडली. याचवेळी मनसेच्या नेत्यांनीही या दोन्ही नेत्यांची भेट घेतली.

  • By anuradha sagar
Updated On: Dec 29, 2025 | 03:37 PM
राज ठाकरे यांच्या मनसेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू

राज ठाकरे यांच्या मनसेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू

Follow Us
Follow Us:
  • पुणे महापालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार
  • काँग्रेस नेते सतेज पाटील आणि ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब
  • मनसेलाही सोबत घेण्याचा विचार सुरू
Pune Municipal 2026: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या युती आणि आघाड्यांच्या हालाचालींना वेग आला आहे. पुणे महापालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. यासंदर्भात आज पुण्यात शिवसेना नेते सचिन अहिर आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि काँग्रेस पुणे महापालिका निवडणुकीला एकत्रित सामोरे जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. रविवारी रात्री दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर आज पत्रकार परिषेदतून ही मोठी घोषणा करण्यात आली.

Pune Election 2026 NCP : ठरलं तर! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; 

काँग्रेस नेते सतेज पाटील आणि ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी पुणे महापालिका निवडणूक सोबत लढवणार असल्याचे जाहीर केलं. यावेळी जागावाटपाची देखील घोषणा करण्यात आली. पुणे महापालिकेत काँग्रेस ६० जागांवर लढणार असून ठाकरेसेना ४५ जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. पण हा आकडा प्राथमिक असून आज सांयकाळपर्यंत फायनल यादी जाहीर केली जाईल. तसेच, उर्वरित जागांबाबत पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल. याशिवाय राज ठाकरे यांच्या मनसेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असं सतेज पाटील यांनी सांगितलं. तर, वंचित बहुजन आघाडीसोबतही आमची सकारात्मक चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात रविवारी रात्री ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात बैठक पार पडली. याचवेळी मनसेच्या नेत्यांनीही या दोन्ही नेत्यांची भेट घेतली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांमध्ये ही महत्त्वाची चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मनसेची भूमिका अद्याप अंतिम झालेली नसून चर्चेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, यावेळी सतेज पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सुरू असलेल्या चर्चेबाबत विचारण्यात आले. यावर, आम्ही गाफील नव्हतो आम्ही दक्ष होतो. आमच्या अंतर्गत चर्चा सुरू होत्या. मनसेसोबत अजूनही चर्चा सुरु आहेत. दुपारपर्यंत सगळं स्पष्ट होईल, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली.

Uddhav Thackeray Candidate List 2026: भाजपपाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 48 उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार – शरद पवार एकत्रित

पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आल्यास मतांची विभागणी कमी होणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आमच्याकडे २९-३० जागा मागितल्या होत्या, पण प्रत्यक्षात मात्र त्यांना १८-२० जागा दिल्या जातील, आज दुपारपर्यंत जागावाटपाची अधिकृत घोषणा केली जाईल असही बहल यांनी स्पष्ट केलं.

 

 

 

Web Title: Thackerays shiv sena and congress will contest together in pune the alliance has been confirmed by satej patil and sachin ahir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Congress
  • Pune Municipal Corporation
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
2

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा
3

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
4

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.