Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंचा निवडणूक अधिकाऱ्यांना थेट इशारा; वणीत नेमकं काय घडलं

उद्धव ठाकरे म्हणाले, मला जास्त भाषणे करण्याची गरज नाही, आम्ही तुम्हाला विजय दिला, असं लोक सांगत आहेत. फक्त 20 तारखेला कोणालाही डोळ्यावर पट्टी बांधून देऊ नका. 

  • By anuradha sagar
Updated On: Nov 11, 2024 | 04:46 PM
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंचा निवडणूक अधिकाऱ्यांना थेट इशारा; वणीत नेमकं काय घडलं
Follow Us
Follow Us:

वणी : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहे. रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि महायुतीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आज उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वणी येथे सभा पार पडली, या सभेसाठी येत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी केली. मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांनाही इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे वणी येथे सभा घेण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगेची तपासणी केली. त्यावरून सभेत बोलताना निवडणूक अधिकाऱ्यांना इशारा देत उद्धव ठाकरेंनी काही प्रश्नही विचारले. तुम्ही जशी माझी बॅग तपासली तशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याही बॅगा तपासल्या का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच जर निवडणूक अधिकाऱी त्यांच्या बॅगा तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या बॅगा तपासतील असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

हेही वाचा : ‘फक्त निवडून द्या, यांना दाखवतेच’, मोबाईल टॉर्चमध्ये सभा घ्यावी लागल्याने कॉंग्रेस नेत्याने थेट शिव्या हासडल्या

उद्धव ठाकरे म्हणाले, मला जास्त भाषणे करण्याची गरज नाही, आम्ही तुम्हाला विजय दिला, असं लोक सांगत आहेत. फक्त 20 तारखेला कोणालाही डोळ्यावर पट्टी बांधून देऊ नका.  आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टीदेखील काढली आहे. त्यामुळे तुमच्याही डोळ्यांवर पट्टी असण्याची गरज नाही, तुम्ही डोळसपणे मतदान करा., मी कोणत्याही माणसांना दोष देत नाही. मी यंत्रणेला दोष देतोय मी हेलिकॉप्टरने आले तेव्हा माझ्या स्वागतासाठी 8-10 जण उपस्थित होते. मी विचारलं काय करायंच आहे. त्यांनी माझी बॅग तपासायची असल्याचे सांगितले. मी त्यांना माझी बॅग तपासू दिली. ज्यांनी तुमची तपासणी केली आता तुम्हीही त्यांची ओळखपत्रे तपासून घ्या. ते जसे तुमचे खिसे तपासतात तसे त्यांचेही खिसे तपासून बघा. हा तुमचाबही अधिकार आहे. जरे तपासणी अधिकाऱ्यांनी अडवलं तर  त्या अधिकाऱ्यांची ओळखपत्रे तपासणे हाही तुमचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

पण यंत्रणेलाही मला काही सांगायचं आहे. जशी तुम्ही माझी बॅग तपासली तशी नरेंद्र मोदी, अमित शाहा यांचीही बॅग तपासली का, ती तपासायला हवी की नको, दाढीवाल्या शिंदेंची बॅग तपासायला हवी की नको,गुलाबी जॅकेटवाले, देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासायला हवी की नको, असे अनेक प्रश्नही उद्धव ठाकरेंनी तपासणी अधिकाऱ्यांना विचारले.

हेही वाचा : एशियन पेंट्सचा शेअर 9.50 टक्क्यांनी घसरला, 2020 नंतर स्टॉकने पहिल्यांदा गाठली निच्चांकी

नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभेसाठी आल्यावर सर्व रस्ते बंद केले जातात, मग हे रस्त्याने सुसाट जातात. पण मोदी असो वा अमित शाह, फडणवीस असोत वा अजित पवार यांच्या बॅगा कधी तपासल्या का, त्या तपासल्या जाणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आता त्यांच्या बॅगा तपासतील.पण इथे पोलिसांनी मध्ये यायचं नाही. निव़डणूक अधिकाऱ्यांनी मध्ये मध्ये यायच नाही, आमच्या बॅग तपासण्याचा जसा तुम्हाला अधिकार आहे तसाच प्रचाराला जो कोणी येईन, त्याची बॅग तपासण्याच अधिकारही मतदारांना आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. म्हटलं आहे.

Web Title: Uddhav thackerays warning to election officials what exactly happened in vani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 04:39 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
3

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल
4

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.